आई झाल्यानंतर ‘तारक मेहता’मधील रिटा रिपोटरने पोस्ट केले बिकनीतील फोटो; फोटोसोबत दिला खास संदेश

आई होणे प्रत्येक  मुलीचे स्वप्न असते. आई झाल्यानंतर स्त्रीयांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. त्या बदलांमूळे अनेकदा घाबरतात. त्या छोटे कपडे घालत नाहीत. तर काही स्त्रीया कोणतीही लाज न बाळगता त्यांच्या शरीराचा स्वीकार करतात.

अभिनेत्री पुजा अहूजाने देखील असेच काही केले आहे. पुजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिकनीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत प्रियाने स्त्रीयांसाठी एक खास संदेश दिला आहे. त्यामूळे तिचे हे फोटो सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

प्रिया म्हणाली की, ‘आई झाल्यानंतर माझ्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. माझे शरीर अजूनही पुर्वीसारखे झाले नाही. पण तरी देखील मी या सगळ्या गोष्टी विसरुन आई होण्याचा आनंद सेलिब्रेट करत आहेत’.

ती पुढे म्हणाली की, ‘मला माहीती आहे माझे शरीर अजूनही जाडजूड आहे. माझ्या शरीरावर स्ट्रेचमार्क आहेत. पण तरीही मला माझा अभिमान आहे. कारण मी एका बाळाला जन्म दिला आहे. ९ महिने मी त्याला माझ्या पोटात वाढवले आहे’.

प्रिया अहूजा हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत  रिटा रिपोटरची भुमिका निभावली होती. त्यानंतर रिटा रिपोटरच्या भुमिकेत अनेक अभिनेत्री दिसल्या. पण मालिका सुरु झाली त्यावेळी प्रियाने रिटा रिपोटरची भुमिका निभावली होती.

या मालिकेमूळे प्रियाला घराघरात ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. पण तिला प्रेक्षक आजही रिटा रिपोटरच्या भुमिकेसाठी ओळखतात. प्रिया सध्या अभिनय क्षेत्रापासून दुर तिच्या वैयक्तिक आयूष्यात व्यस्त आहे.

प्रियाने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदसोबत लग्न केले. लग्नानंतर ती अभिनयापासून दुर गेली. दिड वर्षांपूर्वीचं प्रिया आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या ती आई होणे एन्जॉय करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्रीने सोशल मिडीयावर शेअर केले बाथटबमधील अंघोळ करतानाचे फोटो; लोकांमध्ये रंगली चर्चा

काय सांगता! एकाच वेळी दोघींना डेट करत होते बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा; बघा कोण होत्या ‘त्या’ दोघी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.