ऋषी कपूरने नीतू सिंगला हिऱ्याचा हार देत लग्नासाठी केले होते प्रपोज; वाचा त्यांची हटके लव्ह स्टोरी

ऋषी कपूर आणि नीतू सिंगची जोडी इंडस्ट्रीतील सर्वात हिट जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्या जोडीला बॉलीवूडमधील पावरफुल जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्या लग्नाला ३८ वर्ष पुर्ण झाले आहेत. आज ऋषी कपूर आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या आठवणी नेहमीच लोकांच्या मनात असणार आहेत.

ऋषी कपूरला अभिनय आणि त्यांचा रागीट स्वभाव या दोन्ही गोष्टींसाठी ओळखले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणामूळे ते नेहमीच चर्चेत असायचे. २०२० मध्ये त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना खुप मोठा धक्का बसला होता. एवढे दिवस झाले तरी त्यांच्या आठवणी चाहत्यांमध्ये कायम आहेत.

ऋषी कपूरने त्यांच्या पहील्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहीले नाही. चित्रपट असो किंवा खरे आयूष्य ऋषी कपूर नेहमीच लोकांच्या मनावर राज्य करायचे. आजही त्यांचे राज्य कायम आहे आणि पुढेही राहिल.

त्यांच्या आयूष्यात त्यांचा सर्वात मोठा सपोर्ट सिस्टिम म्हणजे त्यांच्या पत्नी नीतू सिंग. नीतू सिंग आणि ऋषी कपूरच्या लग्नाला ३८ वर्ष पुर्ण झाले आहेत. दोघांच्या लव्ह स्टोरी कोणत्या फिल्मी स्टोरी पेक्षा कमी नाही. सुरुवातीच्या काळात तर नीतू सिंग ऋषी कपूरच्या लव्ह गुरु बनल्या होत्या.

अनेकांना ही गोष्ट ऐकून धक्का बसेल. पण ही गोष्ट खरी आहे. ऋषी कपूरचा स्वभाव खुप मस्करी आणि चिडला होता. त्यामूळे नीतूसोबत त्यांची मैत्री व्हायला वेळ लागला होता. पहील्यांदा तर नीतूने ऋषी कपूरसोबत मैत्री करायला नकार दिला होता.

पण त्यानंतर मात्र त्यांनी होकार दिला. कारण अनेक चित्रपटांमध्यो दोघांना एकत्र काम करायचे होते. त्यामूळे त्यांच्यात मैत्री होणे गरजेचे होते. दोघांची मैत्री झाली त्यावेळी ऋषी कपूर दुसऱ्याच एका मुलीच्या प्रेमात पागल झाले होते. पण नीतू याचा काहीही फरक पडला नाही.

दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. अनेकदा ऋषी कपूरला त्यांच्या अफेअर्समध्ये नीतू सिंग मदत करायच्या. त्या अनेकदा ऋषी कपूरला त्यांच्या गर्लफ्रेंड्सला पटवण्याचे सल्ले द्यायच्या. या कारणामूळे त्यांची मैत्री आणखी घट्ट होत गेली. पण त्यांना या गोष्टीची जाणीव झाली नाही.

ऋषी कपूर अनेक मुलींच्या मागे होते. त्यामूळे अनेकदा नीतू सिंग ऋषी कपूरच्या लव्ह गुरु बनायच्या. तेव्हा दोघांनाही प्रेमाच्या काही भावना नव्हत्या. पण काही दिवसांमध्येच त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. नीतू सिंगने इंडस्ट्रीतील दुसऱ्या अभिनेत्यांसोबत काम करायला सुरुवात केली.

नीतूला दुसऱ्या अभिनेत्यांसोबत बघून ऋषी कपूरच्या त्यांच्याबद्दले प्रेम जाणवले. त्यांनी ही गोष्ट नीतू सिंगला सांगितली. पण नीतूला या गोष्टीवर विश्वास नव्हता. कारण त्यांना ऋषी कपूरच्या स्वभावाबद्दल कल्पना होती. त्यांना वाटले की, हे माझ्यासोबत पण मस्करी करत आहे. म्हणून नीतूने त्यांना नकार दिला होता.

ऋषी कपूर मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांना नीतू सिंग हवी होती. एक दिवस त्यांनी नीतूला ताज हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले. सुरुवातीला त्यांनी नकार दिला होत पण नंतर त्या तयार झाल्या. त्या रात्री ऋषी कपूरने नीतू सिंगला हिऱ्याचा हार देत लग्नासाठी प्रेपोज केले होते.

ऋषी कपूरने नीतूला विचारले की, आजकाल खुप जास्त काम करत आहेस लग्न करायचे नाही का त्यावल नीतू सिंग म्हणाल्या होत्या मी लग्नाला तयार आहे पण चांगला मुलगा भेटला पाहिजे. त्याशिवाय मी लग्न कसे करु यावर ऋषी कपूरने माझ्याशी लग्न कर असे सांगितले.

यावर नीतू सिंगला धक्का बसला होता. पण नंतर ऋषी कपूरचे प्रेम बघून त्यांना लग्नाला होकार दिला. १९८० मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही दोघे एकत्र होते. काहीही झाले तरी नीतू सिंगने त्यांची साथ सोडली नाही. शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होत्या.

महत्वाच्या बातम्या –
‘हम आपके है कौन’ चित्रपटात सलमान खानच्या मागे पळणारी रिटा आठवते का? आज दिसते ‘अशी’
गेल्या २२ वर्षांपासून सनी देओल आणि करिश्मा कपूर लढत आहेत एकच केस
माझ्या बायकोचे माझ्या भावोजीसोबत अफेअर होते; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे खळबळजनक आरोप
फक्त दिलीप कुमारसोबतची मैत्री निभावण्यासाठी संजीव कुमारने स्क्रिप्ट न आवडलेल्या चित्रपटाला दिला होता नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.