Share

Rishi Sunak : VIDEO : याला म्हणतात संस्कृती! ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सूनक यांनी लंडनमध्ये साजरा केला बैलपोळा

Rishi Sunak

Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांपैकी एक असलेले ऋषी सुनक हे त्यांची पत्नी अक्षता मूर्तीसोबत लंडनमध्ये गायीची पूजा करताना दिसले आहेत. ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीचा पूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये पहिल्यांदा ऋषी सुनक पितळच्या भांड्यातून गायीला पाणी अर्पण करत आहेत. त्यानंतर पुजारी त्यांच्या हातात दिवा देताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये गाय रंगांनी सजवलेली दिसत आहे. गोपूजन करत ऋषी सुनक यांनी बैलपोळा हा भारतीय सण लंडनमध्ये साजरा केला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी सुनक दाम्पत्याचे कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये ऋषी सुनक व त्यांची पत्नी गायीची पूजा करताना आणि आरती करताना दिसत आहे. याआधी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ऋषी सुनक भक्तिवेदांत मनोर मंदिरात गेले होते. त्यावेळचे पूजा करतानाचे काही फोटोही समोर आले होते.

त्यानंतर आता त्यांनी गोपूजन केले आहे. तसेच गेल्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली होती. त्यांनी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या शासकीय निवासस्थानी दिवे लावले होते. त्यामुळे ऋषी सुनक लंडनमध्ये भारतीय परंपरांचे पालन करताना दिसत आहेत.

ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस या आहेत. ५ सप्टेंबर रोजी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानाची घोषणा केली जाणार आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी २०१५ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी पहिल्यांदाच संसदेची निवडणूक जिंकली होती.

आज ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. जर ते यशस्वी झाले तर ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान असतील. ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ही इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोपूजनाच्या या व्हिडिओने ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांची मनं जिंकली आहेत.

महत्वाच्या बातम्या
Kirit Somaiya : वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहा, ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्यांना कोर्टाने झापलं
Bollywood : बॉलीवूडवर शोककळा! सनम बेवफा, सौतनसारखे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Waheeda Rehman: बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार वहिदा रेहमानच्या प्रेमात झाला होता वेडा, कुटुंब अन् करिअरही लावले पणाला
Bollywood : बॉलीवूडवर शोककळा! सनम बेवफा, सौतनसारखे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now