भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत शुक्रवारी सकाळपासून चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे तो काळ एका कार अपघाताचा बळी ठरला. पंत दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात असताना त्याच्या कारचा अपघात झाला. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो रक्ताने माखलेला दिसत आहे. यादरम्यान मात्र तो थोडा रागावलेलाही दिसला. पंत याची गाडी खूप वेगात होती आणि याच दरम्यान पंतला झोप आली होती. या कारणामुळे पंत याची गाडी दुभाजकावर चढून पलीकडे जाऊन उलटली.
यानंतर पंत याच्या कारला आग लागली मात्र पंत वेळेत कारमधून बाहेर पडले आणि बचावले. कसातरी जीव वाचवून पंत गाडीतून बाहेर पडले. यावेळी तिथे उभ्या असलेल्या लोकांनी पंतला मदत केली आणि सांभाळले. पंतच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक त्याला मदत करताना आणि पंतला सांभाळताना दिसत आहेत.
यादरम्यान हा व्हिडीओ बनवणारा एक व्यक्ती दुरूनच पंतपर्यंत पोहोचला.पंतला तो व्हिडिओ बनवत असल्याचे पाहताच भारतीय क्रिकेटपटूला थोडा राग आला जो त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यादरम्यान पंत कदाचित त्या व्यक्तीला सांगत होते की, तुम्ही व्हिडिओ का बनवत आहात.
त्यानंतर ती व्यक्ती व्हिडिओ बनवणे बंद करते. व्हिडिओमध्ये पंतच्या डोळ्यावरून खूप रक्त वाहत होते. यासोबतच त्याच्या ओठांवर तसेच गालावरही रक्त दिसत आहे. पंतला प्रथम रुरकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पंत याची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही पंत याच्याबद्दल सांगितले आहे की, त्याच्याशी चांगली वागणूक मिळावी आणि जे काही हवे आहे ते त्वरित पूर्ण केले जावे.
महत्वाच्या बातम्या
pune : पुण्याचे सिंघम! पोलीसांना नडणाऱ्या कोयता गॅंगला भर रस्त्यात दांडक्याने तुडवले; दबंगिरीचा व्हिडिओ व्हायरल
वृद्धाच्या बनियनवर सुनेच नाव, अंतर्वस्त्रात आढळली चिठ्ठी; वृद्धाचा मृतदेह पाहून पोलिसही चक्रावले
एक चान्स दे, नाहीतर तु ज्या मुलासोबत बोलते त्याचे पुरावे मी…; वडिलांच्या मित्राची भयानक मागणी






