रिषभ पंतने जोफ्रा आर्चरला मारलेला डोळ्याचं पारणं फेडणारा रिव्हर्स स्विपचा षटकार पाहीलात का?

अहमदाबाद | भारत विरुद्ध इंग्लंड असा पहिला टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात रिषभ पंतने डोळ्याचं पारणं फेडणारा फटका मारला आहे. रिषभच्या या शानदार फटक्यावर क्रिकेटप्रेमीही बुचकाळ्यात पडले आहेत.

रिषभने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला सामन्यात तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिव्हर्स स्विप षटकार खेचला आहे. तसेच रिषभने त्यापुढच्या चेंडूवर चौकार खेचला. अशाप्रकारे रिषभने २ चेंडूत १० धावा केल्या.

सामना पहाताना रिषभच्या या फटक्यावर क्षणभर विश्वास बसत नाही. त्याच्या या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. क्रिकेटप्रेमी त्याच्या या अविश्वसनीय फटक्याचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर के एल राहुल अवघी १ धाव करुन माघारी परतला. राहुल बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेला कर्णधार विराट कोहली बाद झाला. यावेळी भारताची स्थिती ३ बाद २ अशी झाली होती.

महत्वाच्या बातम्या-
अभिमानास्पद! मिताली राजने बनवला भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम
वीरेंद्र सेहवागची तुफान फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर चौकार तर षटकार खेचत अर्धशतक; पहा व्हिडीओ

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.