Share

शिवसेना आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दंगल; दगडफेक आणि गोळीबारानंतर तलवारीनं हल्ला, पहा Video

पंजाबमधील पटियाला या ठिकाणी आज दोन समुदायांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. रॅली काढण्यावरून हिंदू संघटना आणि शीख संघटना यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्या वादातून हिंदू(Hindu) संघटना आणि शीख संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. त्यामुळे पटियाला परिसरात सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.(Riots between Shiv Sena and Khalistan supporters)

या घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलीस फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तानी आणि शीख फॉर जस्टिस संघटनेचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू यांनी आज खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. शिवसेना (बाळ ठाकरे) नावाच्या स्थानिक हिंदू संघटनेने त्याला विरोध केला होता.

शिवसेना (बाळ ठाकरे) नावाच्या स्थानिक हिंदू संघटनेने खलिस्तानी मुर्दाबाद रॅली काढली होती. या रॅलीला खलिस्तान समर्थकांनी विरोध केला. या रॅलीदरम्यान हिंदू संघटना आणि शीख संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि त्यातून वाद निर्माण झाला. यावेळी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक देखील झाली.

यावेळी एका संघटनेचे कार्यकर्ते हातात तलवारी घेऊन दुसऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पाठलाग करत होते. या घटनेसंदर्भात माहिती देताना हिंदू सुरक्षा समितीचे सदस्य राजेश खेहर म्हणाले की, “आमच्या मंदिरांवर दगडफेक करण्यात आली. खलिस्तानी समर्थकांनी या परिसरातील दुकाने फोडली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत”, अशी माहिती राजेश खेहर यांनी दिली.

खलिस्तान स्थापना दिवसानिमित्त गुरपतवंत सिंग पन्नू यांनी एक घोषणा केली होती. हरियाणातील गुरुग्राम ते अंबालापर्यंतच्या सर्व एसपी आणि डीसी कार्यालयांमध्ये खलिस्तानी ध्वज फडकवला जाईल, अशी घोषणा पन्नू यांनी यूट्यूब चॅनलवरून केली होती. त्यानंतर शीख फॉर जस्टिस संघटनेचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदू संघटनेने खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्यास विरोध केला. त्यातून शिवसेना संघटना आणि खलिस्तानी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पटियाला शहराच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
७० लाखांची नोकरी सोडून तरुणाने सुरु केली आयटी कंपनी, दोन वर्षात १२ कोटींचा टर्नओव्हर
९० वर्षीय ‘पद्मश्री’ कलाकाराची बिकट अवस्था, मोदी सरकारने सामान रस्त्यावर फेकत घराबाहेर हाकलले
पोलिसांनी १६ अटींसह राज ठाकरेंच्या भाषणाला दिली परवानगी; मनसेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now