‘जाळ अन धूर संगटच!’ रिंकू राजगुरुच्या स्टायलिश अंदाजावर नेटकरी तुफान फिदा

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सर्वांनाच माहित आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. रिंकू घराघरात पोहचली ती ‘सैराट’ या चित्रपटातून. तिचा चाहतावर्ग खुप मोठा आहे.

रिंकू सोशल मिडीयावर सक्रीय असलेली पाहायला मिळते. ती तिचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. तिच्या पोस्टचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होताना पाहायला मिळते. नेहमीप्रमाणेच तिच्या काही फोटोंची चर्चा होत आहे.

रिंकूने नुकतेच तिचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. ज्यात चाहत्यांना तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये ती अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये तिने लावलेला गॉगल तिला शोभून दिसत आहे.

तसेच रिंकूने एका फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की ‘फ्रेश एअर’ म्हणजेच ताजी हवा. तिच्या या फोटोंनाही चाहत्यांचे खूप प्रेम मिळालेलं आहे. रिंकू अनेक वेळा शेतात काम करतानाचे व्हिडिओ देखील शेअर करत असते. त्यामुळे चाहत्यांची अनेक छान कमेंट वाचायला मिळतात.

How did Rinku Rajguru became Aarchi! - Prittle Prattle News

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने मराठी सोबत हिंदी चित्रपटामध्येही उत्तम कामगिरी केलेली पाहायला मिळते. त्यामुळे तिचे अजूनच फॅन फॉलविंग वाढलेली दिसत आहे. तिने नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘छूमंतर’ चित्रपटाचे शुटींग लंडनमध्ये पूर्ण केले आहे.

या चित्रपटामध्ये रिंकूसोबत आपल्याला प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. तसेच रिंकू हिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘झुंड’ या चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे. या चित्रपटात आकाश ठोसर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हे ही वाचा-

मराठा आरक्षणाचा एल्गार! संभाजीराजेंच्या नेतृत्वात कोल्हापूरात पहीला मोर्चा; प्रकाश आंबेडकरही सहभागी

जगाची जिरवण्याच्या नादात चीनचीच जिरणार? या प्रकरणामुळे लाखो लोकांना मृत्यूचा धोका

या इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.