रिंकू राजगुरुच्या मराठमोळ्या लुक्समधील फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा फोटो

दिल्ली | रिंकूने सैराट या चित्रपटानंतर सगळीकडेच आपला जादू पसरवला. तिच्या अभिनयाने तिचा चाहतावर्ग खूप वाढला आहे. रसिकांच्या मनात तिने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रिंकूने नुकतेच आपल्या सोशल मीडियावरून नवीन लुक्सचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमधून तिचा वेगवेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. या नव्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. चाहत्यांची या फोटोंना खूप पसंती मिळत आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव होत आहे.

रिंकू नुकतीच लंडनला गेली होती. तिने नुकतेच आपल्या येणाऱ्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तिचा छुमंतर हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

या चित्रपटात रिंकू सोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी आणि श्रीनिवास पोकळे मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच हे सर्व कलाकार लंडनहून भारतात परतले आहेत. या चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, रिंकू नेहमीच आपल्या लुक्समुळे चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर नवनवीन फोटोज टाकत असते. तिच्या फोटोंना नेहमी चाहते लाईक्स आणि कंमेंट्स करत असतात. कधी मराठमोळ्या वेशात तर कधी मॉडर्न लूकमध्ये रिंकू नेहमी फोटो टाकत असते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.