Share

Rinku Rajguru Lavani Dance : कातिल अदा अन् घायाळ करणारी नजर; लावणी किंगला तगडी टक्कर देत अभिनेत्रीचे सादरीकरण; म्हणाली- ‘फक्त 2 तास…’

Rinku Rajguru Lavani Dance : मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru Marathi actress) हिचा नवा अवतार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘सैराट’मधील आर्चीपासून ते अलीकडच्या ‘आशा’ चित्रपटातील भूमिकेपर्यंत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयासोबतच नृत्याची आवड जपत तिने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक खास लावणी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

‘राजसा जवळी जरा बसा’ या अजरामर गीतावर सादर केलेल्या लावणीत तिचे भाव, ठसके आणि आत्मविश्वास प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत आशिष पाटील (Ashish Patil Lavani choreographer) यांचीही साथ असून, हा व्हिडिओ ‘कलांगण’ डान्स स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला आहे.

फक्त आवड, कोणतीही मोठी तयारी नाही

हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लावणीशी असलेलं आपलं नातं उलगडून सांगितलं. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या आठवणी मनात साठलेल्या असल्याचं तिने नमूद केलं. अनेक वर्षांनंतर पुन्हा लावणी करण्याचा हा छोटासा प्रयत्न असून, तो प्रेक्षकांसोबत शेअर करताना आनंद होत असल्याचं तिने सांगितलं.

या सादरीकरणासाठी कोणताही मोठा सराव किंवा तयारी केली नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. “जास्त तयारी नाही, फक्त आवड… केवळ दोन तासांचा सराव करून शूटिंग पूर्ण केलं,” असं सांगत तिने या व्हिडिओमागचं खास कारण उघड केलं.

लावणी किंगलाही दिली तगडी टक्कर

लावणी म्हटलं की आशिष पाटील यांची शैली नेहमीच लक्षात येते. ‘लावणी किंग’ ही उपाधी सार्थ ठरवणारं त्यांचं सादरीकरण असतंच; मात्र या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीनेही तितक्याच ताकदीने सादरीकरण करत प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. तिच्यावरून नजर हटवणं कठीण झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या लावणी सादरीकरणाचं भरभरून कौतुक केलं असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now