सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या रिमी सेनने का सोडली फिल्म इंडस्ट्री?

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत. ज्यांना रातोरात यश मिळाले आहे. पहील्या चित्रपटानंतर रातोरात मिळाले स्टारडम टिकवून ठेवणे कलाकारांसाठी कठिण असते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रिसी सेन. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले ते यशस्वीही झाले. पण रिमीला ते स्टारडम शेवटपर्यंत ठिकवता आले नाही.

तिने धुम, जॉनी गद्दार, हंगामा, गोलमाल, फिर हैरा फेरी अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. तिचे चित्रपट यशस्वीही झाले. पण हे यश रिमीला सांभाळता आले नाही. काही दिवसांमध्येच ती इंडस्ट्रीतून झाली आणि आज गुमनामीचे आयूष्य जगत आहे.

एवढ्या वर्षांनंतर रिलीने फिल्म इंडस्ट्री सोडण्यामागचे खरे कारण सांगितले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यामूळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. जाणून घेऊया रिमीने इंडस्ट्री सोडण्याचे काय कारण सांगितले.

रिमी म्हणाली की, ‘त्यावेळी मी माझ्या कामामूळे आनंदी नव्हते. मला थोडे वेगळे काम करायचे होते. जसे की, आजच्या काळात श्रीराम राघवन करत आहेत. मी चित्रपट करत होते पण त्यात मी आनंदी नव्हते. म्हणून मी नाखुश होते’.

अभिनयाला मी दुसऱ्या कामाप्रमाणेच समजत होते. जसे लोकं आयूष्य जगण्यासाठी काम करतात. अभिनयाचे तसेच आहे. पण अभिनय हे खुप क्रिएटिव्ह काम आहे. जोपर्यंत मला ही गोष्ट समजली तोपर्यंत मी कॉमेडी करु लागले होते.

रिमीने पुढे सांगितले की, ‘कॉमेडीला सोडण्यासाठी मी ‘जॉनी गद्दार’सारखा चित्रपट केला. पण त्यामूळे काहीही फायदा झाला नाही. मला अजून खुप जास्त मेहनत करावी लागणार होती. ज्यासाठी मी तयार नव्हते. अशा परिस्थितीत मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला’.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘मला प्रसिद्धी आवडत नव्हती. आजही मला प्रसिद्धी आवडत नाही. मी इंडस्ट्रीमध्ये एका दशकापुर्वी आले होते. अभिनयासोबतच मी प्रोडक्शनमध्ये देखील काम केले. मी नॅशनल आवॉर्ड विजेत्या चित्रपटाची निर्मिती केली. अभिनेत्री असल्यामूळे प्रोडक्शनमध्ये काम करणे सोपे गेले. आशा आहे की माझा पुढचा प्रवास चांगला असेल’.

रिमी सेन आज चित्रपटांपासून लांब असली तरी तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मिडीयावर देखील ती मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. रिमीने तिच्या करिअरमध्ये अक्षय खन्ना, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, नील नितीन मुकेशसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले.

महत्वाच्या बातम्या  –

किसिंग सीन दिल्यानंतर रागावलेल्या बायको मनवण्यासाठी ‘हे’ काम करायचा इम्रान हाश्मी

गोविंदा नसते तर अजय देवगन बॉलीवूड सोडून घरी बसले असते; वाचा पुर्ण किस्सा
फोटोतील छोटा मुलगा आज बॉलीवूडमध्ये करतो राज्य; नाव ऐकून चकित व्हाल
मुनमून दत्ताचे ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमधले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल; फोटो पाहून लोकं झाले वेडी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.