कुत्र्याला लाथ मारायला गेला रिक्षावाला आणि सुटला रिक्षाचा ताबा; पहा पुढे काय घडलं

सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. आता सध्या एका पिंपरीच्या रिक्षावाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये एक रिक्षा चालक कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ते त्याला चांगलेच महागात पडले आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात त्याचा रिक्षावरचा ताबा सुटला आहे.

भरधाव वेगात असणाऱ्या रिक्षासमोर अचानक कुत्रा आल्याने एक अपघात घडल्याची घटना घडली आहे. कुत्रा हा रस्ता ओलांडण्यासाठी बाजुला उभा होता. हे पाहून रिक्षावाल्याने त्या कुत्र्याला लाथ मारुन बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचवेळी त्याचा रिक्षावरचा ताबा सुटला आहे.

रिक्षावरचा ताबा सुटल्याने रिक्षा दुभाजकावर जोरात आदळली होती. इतकेच नाही तर बराचवेळ रिक्षा थांबतच नव्हती. त्यानंतर आसपासच्या लोकांनी ही रिक्षा थांबवली आहे. हा सर्वप्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

पिंपरीच्या शगुण चौकात शनिवारी ही घटना घडली आहे. एक रिक्षा चालक आपली रिक्षा घेऊन जात होता. मात्र रस्त्यात कुत्रा दिसताच त्याने त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे करत असतानाच त्याचा रिक्षावरचा ताबा सुटला आणि रस्ता दुभाजकावर आढळली. सुदैवाने यात कुठलिही जीवत हानी झालेली नाही.

तसेच व्हिडिओमध्ये रिक्षा समोरुन एक कार येताना दिसत होती, जर त्या दोघांची टक्कर झाली असती, तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र जवळपासच्या नागरीकांनी प्रसंगावधाव दाखवत ती रिक्षा थांबवली. त्यामुळे एक मोठा अपघात टळला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना संक्रमित नवऱ्यापासून लांब नाही राहू शकली शिल्पा; बिंधास्त केले किस, पहा फोटो
नियम पायदळी तुडवून हळदीचा कार्यक्रम होता सुरू; कार्यक्रमात वाद झाला अन् पाहूण्यांना धू धू धुतलं
..म्हणून इम्रान खान आणि रेखाच्या लग्नाच्या बातम्या सगळीकडे छापून आल्या होत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.