कंगणाचा धक्कादायक खुलासा; शेतकऱ्यांविषयी बोलण्यासाठी रिहानाला ‘या’ कंपनीने दिले १८ कोटी रूपये

पॉप सिंगर रिहाना सध्या खुप चर्चेत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल तिने ट्वीट केल्यानंतर अनेक बाहेरील सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात ट्वीट्स केले होते . त्यानंतर खुप वाद पेटला आहे.

रिहानाच्या ट्विटला अवघ्या ३ दिवसात ३ लाख ४१ हजार ९०० रिट्विट तर १ लाख ५५ हजार कमेंट्स केल्या आहेत. तसेच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटच्या फॉलोवर्सच्या पुढे पाऊल टाकले आहे. देशात तिच्या या ट्विटमुळे खळबळ माजली आहे. तिने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी १८ कोटी रूपये घेतले असल्याचं समोर आलं आहे.

फोब्स मॅग्जीन नावाच्या पीआर कंपनीने रिहानाला शेतकरी आंदोलनाविषयी बोलण्यासाठी २.५ मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल १८ कोटी रूपये दिले असल्याचं ट्विट बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने केले आहे. रिहानाच्या शेतकऱ्यांविषयीच्या ट्विटनंतर हा सर्व रचून केलेला कट असल्याचं बोललं जात आहे.

फोब्स मॅग्जीन ही एक मीडिया कंपनी आहे. दरवर्षी देशभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अभिनेत्यांच्या नावाची यादी बनवत असतात.

महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला; “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना…”
बाबो! रिलीजच्या आधीच ‘या’ चित्रपटाने कमवले ३४८ करोड, बाहुबलीचाही रेकॉर्ड मोडला; पाहा ट्रेलर
चीनच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही तेवढा शेतकऱ्यांसाठी लावलाय; राज ठाकरेंचा केंद्रसरकारवर हल्लाबोल
‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा…; राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.