रिहानाचा आणि ख्रिस गेलचा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना सध्या खुप चर्चेत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल तिने ट्वीट केले होते. यानंतर अनेक बाहेरील सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात ट्वीट्स केले. यानंतर खुप वाद पेटला.

देशातील राजकीय वातावरण तापले. या आंदोलनाची जागतिक पातळीवर दखल घेण्यास सुरूवात झाली. रिहानाने ट्वीट केल्यानंतर अनेक मोठ्या लोकांनी आपले मत मांडले. याच दरम्यान रिहानाचा सध्या एक व्हिडीओ खुप चर्चेत आला आहे.

हा व्हिडीओ वेस्ट इंडिजचा धडाकेबाज ख्रिस गेल आणि रिहानाचा आहे. हा व्हिडीओ २०१९ मधील आहे. रिहाना आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेशवैट हे एकाच वर्गात शिकायला होते. त्यामुळे रिहानाची ख्रिस गेलशी चांगली मैत्री आहे.

त्याच्या ओळखीनेच रिहानाला वेस्ट इंडिच्या ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री मिळाली होती. २०१९ च्या वन डे विश्वचषकाच्यावेळी रिहाना ड्रेसिंग रूममध्ये आली होती. त्यावेळी तिने ख्रिसगेलसोबत फोटो काढले होते. त्याचसोबत तिने बॅटवर ख्रिसगेलची स्वाक्षरीसुद्धा घेतली होती.

हा व्हिडीओ रिहानाने ट्वीट केल्यानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, रिहानाने ट्वीट केल्यानंतर अनेक भारतातील सेलिब्रिटींनी तिच्यावर टिका केली होती. तिने शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केल्यानंतर भारताच्या अनेक सेलिब्रेटीनी तिच्यावर टिका केली होती.

३२ वर्षीय रिहाना एक पॉप सिंगर आहे. पंधरा वर्षांपुर्वी तिने तिच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. बिलबोर्ड हॉट १०० यादीत स्थान मिळवणारी ती सर्वात कमी वयाची गायिका आहे. रिहानाला आजपर्यंत ८ ग्रँमी मिळाले आहेत.

तिचे मुळ नाव रॉबिन रिहाना फेंटी आहे. २००५ साली तिचा पहिला अल्बम प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर तिला खुप प्रसिद्धी मिळाली होती. एप्रिल २००६ मध्ये तिचा अल्बम गर्ल लाईक मी रिलीज झाला होता. या गाण्याने खुप लोकप्रियता मिळवली. टॉप १० गाण्यांमध्ये या गाण्यांनी स्थान मिळवले होते.

महत्वाच्या बातम्या
मारिया माफ कर, तू बरोबर होतीस; ‘आता आम्हीही सचिनला ओळखत नाही’
मराठमोळा दिग्दर्शक सचिनवर भडकला; ‘माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण…..’
उद्योगपती असावा तर असा! कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांना पेन्शन, मुलांना शिष्यवृत्ती आणि पत्नींना वेतन
मालिकेत भोळी दिसणारी ‘अंगूरी भाभी’ खऱ्या आयुष्यात आहे खूपच हॉट आणि ग्लॅमरस, पाहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.