फक्त ‘या’ एकमेव कंपनीला आहे भारताचा तिरंगा झेंडा तयार करण्याचा अधिकार; जाणून घ्या…

आपल्या भारत देशावर देशातील प्रत्येक नागरिकाचं प्रेम आहे. भारतात विविध जातीधर्माची, संस्कृतीची लोकं राहतात. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राजधानी दिल्ली मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला भारतातील राजकीय व्यक्ती तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती उपस्थित असतात. त्या दिवशी राजपथावर भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेला तिरंगा फडकवला जातो. पण आपण कधी विचार केला आहे का भारताचा तिरंगा कोण बनवतं. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल

कर्नाटक राज्यातील हूबळी येथे तिरंगा बनवला जातो. कर्नाटकमधील खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाकडे हा तिरंगा बनवण्याचा ठेका देण्यात आला आहे. दरवर्षी येथे तिरंगा बनवण्याचं काम चालतं. देशातील ही फक्त एकच कंपनी आहे जी राष्ट्रीय ध्वज तयार करण्याचं काम करते. खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाची स्थापना १९५७ साली झाली होती.

तिरंगा तयार करण्यासाठी सर्वात आधी उत्तम दर्जाच्या कच्चा कॉटनचा धागा बनवला जातो. त्यानंतर तिरंग्याचा कापड तयार करण्यात येतो. त्याच्यावर अशोक चक्राची छपाई, तीन रंगांच्या पट्ट्यांची शिलाई, इस्त्री केली जाते. मग ध्वजाची दर्जा तपासली जाते.

तिरंगा बनवताना आकार, लांबी, रूंदी, अशोक चक्राचा आकार, रंगाचं प्रमाण या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जाते. यामध्ये थोडासा जरी फरक आढळून आला तर तो ध्वज नाकारला जातो.

महत्वाच्या बातम्या-
खास कॅप्शनसह वरुणने शेअर केले लग्नाचे फोटो; ‘या’ शब्दात केलेय बायकोचे कौतूक..
शेतकऱ्यांपासून जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या, पहा धक्कादायक व्हिडीओ
मुंबईची लेडी सिंघम! १४ व्या वर्षी केले लग्न १८ व्या वर्षी बनली आई अन् अशी झाली आयपीएस
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.