टिम इंडियाचा कोच होण्यासाठी रिकी पॉन्टिंगने दिला नकार, आता राहुल द्रविडबाबत केले मोठे वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघाला राहुल द्रविडच्या रूपाने नवा कोच मिळाला आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर न्यूझीलंड सीरीजमधून द्रविडने ही जबाबदारी स्वीकारली आहे. द्रविडने आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीला सिनियर संघासोबत विजयासह सुरुवात केली.

बुधवारी झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. द्रविड संघात सामील झाल्यामुळे बहुतेक लोक आनंदी आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने द्रविडने हे पद स्वीकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

द्रविडने याआधी प्रशिक्षक होण्यास नकार दिला होता, पण नंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या सांगण्यावरून त्याने हे पद स्वीकारले. द ग्रेड पॉडकास्टशी बोलताना पॉन्टिंग म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे तर द्रविडने ही जबाबदारी उचलली याचे मला आश्चर्य वाटते.

अंडर-19 च्या भूमिकेत तो खूप खूश असल्याची चर्चा होती. मला त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती नाही पण मला माहित आहे की त्याला मुले आहेत. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी घेतली याचे मला आश्चर्य वाटते.

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही त्यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याची ऑफर मिळाल्याचे म्हटले आहे. त्याने सांगितले की हा प्रस्ताव त्याच्या समोर आयपीएल-2021 दरम्यान आला होता.

माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितले की जे लोक त्याच्याकडे ही ऑफर घेऊन आले होते ते त्याला प्रशिक्षक बनवण्यासाठी खूप प्रतिबद्ध होते परंतु कामाच्या ताणामुळे त्याने ही ऑफर स्वीकारली नाही.

तो म्हणाला की, आयपीएलदरम्यान मी काही लोकांशी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबद्दल बोललो. ज्या लोकांशी मी बोललो त्यांना वाटत होते की मी प्रशिक्षक बनावे. पहिली गोष्ट म्हणजे की मी इतका वेळ देऊ शकत नाही. याचा अर्थ असा होईल की मी आयपीएलमध्ये प्रशिक्षण देऊ शकणार नाही. तसेच, मला चॅनल 7 सोबत काम करणे सोडावे लागेल.

पाँटिंग हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक असून त्याच्या आगमनानंतर संघाने नवीन उंची गाठली आहे. तो प्रशिक्षक होताच, संघाने 2019 मध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

२०२० मध्ये, संघ प्रथमच आयपीएल फायनल खेळला परंतु मुंबई इंडियन्सकडून विजेतेपदाचा सामना गमावला. 2021 मध्ये तो संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात यशस्वी ठरला. दिल्ली कॅपिटल्सपूर्वी पॉन्टिंगने मुंबई इंडियन्ससोबतही काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या
…तर भारत देश जिहादी बनेल; कंगना पुन्हा बरळली
नमाज पढण्यासाठी हिंदू व्यक्तीने दिले दुकान; म्हणाला जागा कमी पडत असेल तर घर, अंगनही देईल
धक्कादायक! महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर उडाली खळबळ
रामसेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयला येतीय आईची आठवण; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.