अभिमानास्पद! रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, इस्रोमध्ये सायंटिस्ट पदासाठी निवड

बदलापूर । परिस्थितीवर मात करत बदलापूरमधील एका रिक्षा चालकाच्या मुलाची इस्रोत ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देवानंद सुरेश पाटील असे या तरुणाचे नाव आहे.

त्याने मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये शिक्षण घेतले असून सध्या टाटा स्टिल जमशेदपूर येथे इंजीनिअर म्हणून काम करत आहे. यापूर्वी देवानंदची रेल्वे लोको पायलट म्हणून निवड झाली होती. परंतु ही नोकरी त्याने नाकारली.

आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, असे तो आपल्या घरी सतत सांगत होता. टाटा स्टीलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत होता. यामध्ये इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था परीक्षेत देवानंद देशात ओबीसीमध्ये पहिला आला आहे.

यामध्ये त्याची जूनियर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. महिन्याभरात त्याची नियुक्ती कोणत्या ठिकाणी होणार हे स्पष्ट होणार आहे. देवानंदची एक बहीण इंजिनियर म्हणून नोकरी करत आहे. तर दुसरी जळगाव शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.

देवानंदच्या या यशामुळे बदलापूरच्या लौकिकात भर पडली आहे. यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वडिलांनी रिक्षा चालवून आणि आईने पापड विकून मुलांना शिकवले आहे.

यामुळे आता मुलांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. एक प्रामाणिक रिक्षाचालक म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. परिस्थितीवर मात करून त्याने हे यश मिळवले आहे.

ताज्या बातम्या

संकटात टाटा करणार गरजूंची मदत; ‘या’ योजनेसाठी दिले दोन हजार कोटी

शेतकऱ्यांना २ रुपये दरवाढ! गोकुळ जिंकताच सतेज पाटलांची मोठी घोषणा

या ठिकाणी मृत्यु बघत असतो सगळ्यांची वाट; जाण्याआधीच व्हा सावधान

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.