Share

‘या’ क्रिकेटपटूने IPL मध्ये मिळालेले करोडो रूपये दिले वडीलांना; म्हणाला त्या पैशांपासून मला लांबच ठेवा

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक होता. IPL इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईला IPL च्या या हंगामात केवळ ४ विजय नोंदवता आले. एवढेच नाही तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई पहिला संघ ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा हा सर्वात खराब हंगाम होता.(IPL Apal, Mumbai Indians, Rohit Sharma, Tilak Verma, Team David, David Bravis, K Mahela Jayawardene, Money)

पण मुंबईसाठी या हंगामातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिलक वर्मा, टीम डेव्हिड आणि डेवाल्ड ब्रेव्हिस सारख्या काही युवा फलंदाजांनी आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. संघाला आशा दिली की ते पुढील हंगामात आणखी चांगल्या पद्धतीने पुनरागमन करतील.

पण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा विचार केला तर तिलक वर्मा सर्वात यशस्वी ठरला. संपूर्ण मोसमात त्याने १४ सामन्यांत ३६ च्या सरासरीने ३९७ धावा केल्या. प्रशिक्षक महेला जयवर्धनेपासून कर्णधार रोहित शर्मापर्यंत सर्वांकडून तिलक वर्माचे कौतुक करण्यात आले.

तिलक लवकरच भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी त्याला १.७ कोटी रुपये मिळाले. तिलक वर्माने एका मुलाखतीत सांगितले की, भरपूर मिळालेल्या पैशाने त्याचे खेळावरील लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्याने IPLमध्ये मिळालेले सर्व पैसे वडिलांना दिले.

तो म्हणाला की “पैशामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. म्हणून मी माझे सर्व पैसे माझ्या वडिलांना दिले आणि त्या पैशापासून मला दूर ठेवण्यास सांगितले.” तिलक एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे आणि त्याचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. प्रशिक्षणावेळी तो कित्येक दिवस अन्नाशिवाय राहीला आहे.

मात्र, या पैशातून एक कार घ्यायची तिलकची इच्छा आहे. त्याला एक कार खरेदी करायची आहे जेणेकरून तो बसमधून प्रवास टाळू शकेल आणि आरामात प्रशिक्षणासाठी जाऊ शकेल. तो म्हणाला की बसमधील लोक मोठ्या किट बॅगमुळे त्याच्याबद्दल खूप तक्रारी करायचे.

महत्वाच्या बातम्या
आश्रम ३ च्या सोनियाने शेअर केला बाथटबमध्ये आंघोळ करताचा व्हिडीओ, पाहून बाबा निरालाही वेडा होईल
मशिदी व मदरशांमध्ये कॅमेरे बसवावेत, प्रत्येक हालचालींवर नजर ठेवावी; हिंसाचारानंतर विहींपची मागणी
‘तुम्ही सिनेमागृहात आलात का?’ हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याला फटकारले; व्हिडिओ झाला व्हायरल
दहावीला इंग्रजीत ३६, विज्ञानात ३८, गणितात ३६ गुण, तरीही झाले कलेक्टर; कसा केला कारनामा? वाचा..

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now