जगातील सर्वात श्रीमंत जोडपं मायक्रोसाॅफ्टचे बिल आणि मेलींडा गेट्स घेणार घटस्फोट

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाला एकच धक्का बसला. त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

आम्ही खूप विचार केल्यानंतर आणि आमच्या नात्यावर काम करुन अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत एक पत्रक जारी केले आहे. यामध्ये मागील २७ वर्षांच्या प्रवासात आम्ही ३ मुलांना वाढवले आणि जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली.

आम्ही घटस्फोटानंतरही ते काम करणं सुरुच ठेऊ. भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही कपल म्हणून एकत्रित राहू शकत नाही. आम्ही एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. तसेच आम्हाला यासाठी अवकाश आणि खासगीपण द्यावे हीच विनंती, असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

२७ वर्षांच्या वैवाहिक नात्यातून वेगळे होत त्या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे आता ते पुढे एकत्र असणार नाहीत, त्यांचे काम मात्र चालू राहणार आहे.

१९८०च्या दशकात बिल आणि मेलिंडा यांची ओळख झाली. मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये काम करायला सुरुवात केली होती. तीन मुलांचे पालक असलेले बिल आणि मेलिंडा हे दोघं मिळून बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन नावाची संस्था चालवतात.

तसेच ते साथीच्या आजारांनी त्रस्त मुलांच्या आरोग्यावर, लसीकरणासाठी या संस्थेने पुढाकार घेऊन कोट्यवधी रुपये खर्च करतात. फोर्ब्स मासिकानुसार, १२४ बिलिअन डॉलर इतक्या प्रचंड संपत्तीचे मानकरी बिल जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत.

ताज्या बातम्या

गोलमाल फेम विकास कदमची बातच न्यारी; करतोय कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा भारी

‘तारक मेहता..’ मालिकेत दयाबेन कधी येणार? निर्माते असीम मोदींनी स्पष्टच सांगीतलं..

हिंदू मुस्लिम केल्यामुळे माणसं गमवावी लागताहेत; इरफानच्या बायकोचा सरकारवर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.