मुंबईतील हा भिकारी आहे देशातील सर्वात श्रीमंत भिकारी, करोडो रुपयांचे आहेत फ्लॅट सोबतच…

 

जगात प्रत्येकाचेच एक कुटुंब असते, त्यांना सांभाळण्यासाठी प्रत्येकजण काम करत असतो. त्यातून मिळालेल्या पैशातून तो घर चालवतो. अनेकदा आपण रस्त्यात दिसणाऱ्या भिकाऱ्यालाही पैसे देतो, पण तुम्हाला जर असे म्हटले की भारतात असे की काही भिकारी आहेत ज्यांची कमाई तुमच्यापेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा भिकारी लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांची संपत्ती करोडो रुपयांमध्ये आहे. तसेच त्यांच्याकडे लक्झरी बंगले, आलिशान गाड्यांसोबत चांगला बँक बॅलन्ससुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते भिकारी.

१. भरत जैन- मुंबईमध्ये राहणाऱ्या भरत जैन यांना देशातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडे ७० लाख रुपयांचे दोन फ्लॅट आहे. तसेच त्यांची महिन्याची कमाई ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
२. लक्ष्मी- देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून लक्ष्मी यांना ओळखले जाते. ते कोलकतामध्ये राहतात. त्यांनी १९६४ पासून भिक मागण्यास सुरुवात केली होती, तेव्हा ते फक्त १६ वर्षाचे होते. ५० वर्षात त्यांनी भिक मागून प्रचंड पैसे कमावले आहेत, त्यांची महिन्याची कमाई ४० हजार रुपये आहे.

३. गीता- देशातील सर्वात श्रीमंत भिकारी लोकांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर गीताचे नाव आहे. त्या मुंबईतील भिकारी आहे. त्यांची महिन्याची कमाई ४५ हजार रुपयांपर्यंत होते. त्यांना कमाई करुन एक फ्लॅट विकत घेतला असून सध्या त्या त्यांच्या भावासोबत राहतात.

४. चंद्र आझाद- एकेकाळी गोवंडीत राहणारे चंद्र आझाद हे सर्वात श्रीमंत असणाऱ्या भिकाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर होते. २०१९ मध्ये त्यांचा एका रेल्वे अपघातात मृत्यु झाला होता, जेव्हा त्यांची संपत्तीची तपासणी केली, तेव्हा त्यांचा एक गोवंडीत एक फ्लॅट, बँक अकाऊंटमध्ये ८ लाख रुपये तर रोकड दीड लाख इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती.

५. पप्पु- या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत बिहारमध्ये राहणारे पप्पु. पप्पु यांचा एका अपघातात पाय फ्रॅक्चर झाला होता, तेव्हापासून त्यांनी भिक मागण्यास सुरुवात केली होती. त्यांच्याकडे तब्बल १.२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.