सुशांतच्या पुण्यतिथीच्या आधी रियाने शेअर केला पॉवरफुल मेसेज, चाहते म्हणाले, आम्ही तुझ्यासोबत..

जून २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ज्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही नेहमी चर्चेत होती. तिची अनेकवेळा चौकशी करण्यात आली आणि तिला तुरूंगातही टाकण्यात आले होते.

त्यामागे तशी कारणंही होती. वादाच्या भोवऱ्यात तिचे नाव अडकले होते. पण नंतर ती या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडली आणि आता आपले जीवन जगत आहे. सुशांतच्या आत्महत्येला एक वर्ष पुर्ण होण्यासाठी काही दिवस राहिलेले असताना रियाने एक पोस्ट केली आहे.

या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्याचे दिसत आहे. तिने पोस्ट केली आहे की, मोठ्यातली मोठी दुख ताकद देऊन जातात. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, असं तिने पोस्टमध्ये लिहीले आहे.

ही पोस्ट वाचून अनेकांनी तिला धीर दिला आहे. अनेकांनी आम्ही तुझ्यासोबत आहोत असे सांगत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, १४ जून २०२० रोजी सुशांतने आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतचे वडील के के सिंह यांनी रियाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

अनेक गंभीर आरोप त्यांनी तिच्यावर केले होते. ज्यानंतर सीबीआय, एनसीबी आणि ईडीकडून तिची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना एनसीडी कायद्याअंतर्गत अटक झाली होती.

नंतर तिची सुटका झाल्यानतंर ती सोशल मिडीयापासून लांब झाली होती. जामीनावर सुटका होण्यापुर्वी साधारण एक महिन्यापुर्वी तिला कारावासाची शिक्षा झाली होती. पण आता तिने केलेल्या या पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

महत्वाच्या बातम्या
सुशीलकुमारच्या हातात लाकडी दांडका, जखमी सागर धनगड हात जोडून जीवाची भिक मागत होता; पहा मर्डरच्या दिवसाचा व्हिडीओ
कधी एअरपोर्टवर काढली पँट तर कधी तरुणीचा खाला मार; ‘या’ घटनांमुळे सतत वादात आदित्य नारायण
लाडक्या लक्ष्याची लेक स्वानंदीने ठेवलं वडिलांच्या पावलावर पाऊल; पहा तिची अभिनयातील पहीली झलक
राजा, आमचं खूप नुकसान झालंय, शिक्षीकेचा राज ठाकरेंना फोन; राज म्हणाले काही काळजी करु नका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.