रियाने सुशांतच्या बहीनींवर केलेल्या आरोपांबाबत सीबीआयने केली भूमिका स्पष्ट; म्हणाले..

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी प्रियंका व मीतू यांनी बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देण्यात येत होती. त्यामुळे त्याची मानसिक आजार बळावला असा आरोप रिया चक्रवर्तीने केला होता.

यावर सीबीआयने बुधवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. सीबीआयने बॉम्बे हायकोर्टात सांगितले की, रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींवर जे आरोप लावले ते काल्पनिक आहेत. तसेच सुशांतच्या बहिणींनी सुशांतसाठी खोटं मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केले असल्याचा आरोप रियाने लावला होता.

याचबरोबर ‘पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याआधी सुरूवातीला तपास करायला हवा. एकाच गोष्टीसाठी दोन एफआयआर दाखल केल्या जाऊ शकत नाही. आम्ही सुशांतच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहोत, असे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जून महिन्यात आत्महत्या करण्याआधी एक चुकीचं प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला. जेणेकरून सुशांत नाकोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सब्सटेंसेस अॅक्टनुसार बॅन केलेली औषधे घेऊ शकेल, असा रियाने आरोप लावला होता.

याचबरोबर याप्रकरणी ७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा तसेच सीबीआयने कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी करत प्रियंका आणि मीतू यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला माहीत आहे का? शाहरूख खानची चंद्रावर जमीन आहे जी त्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे..
राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल तयार; उर्मिला मातोंडकरांना डच्चू
भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.