‘आपले आयुष्य उध्वस्त केले’, रिया तुरुंगातून घरी येताच रियाच्या आईने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला आहे.  तब्बल २८ दिवसानंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली आहे. याचबरोबर या आधी ३ वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र ७ ऑक्टोबर रियाचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

तसेच रियाला ८ सप्टेंबरला दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले होते, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत रियाचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता.

परंतु, आता जामीन मिळाल्यानंतर रिया ८ ऑक्टोबर आपल्या घरी परत आली. मिळालेल्या माहितीनुसार रिया घरी आल्यानंतर आई (संध्या चक्रवर्ती)  या महिन्यांत आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे नष्ट झाले, याबाबत त्यांनी दुःख दोन्ही व्यक्त केले आहे.

तसेच आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान आहे, आपल्याशी कसे वागवले जात आहे, हे माहित असतानाही तिने धैर्य राखले. जेव्हा रिया घरी आली तेव्हा रिया आम्हाला पाहून म्हणाली, ‘तुम्ही लोक इतके दु:खी का दिसत आहात? असा प्रश्न तिने उपस्थित केला.

दरम्यान रिया तुरुंगात असताना मी झोपू शकत नवते, खाऊ शकत नवते कारण माझी मुलगी तुरूंगात होती. माझे कुटुंब उध्वस्त झाले आहे. एक वेळ असा होता जेव्हा मी आत्महत्येचा विचार करायला लागले होते, रियाला जामीन तर मिळाला आहे, व रियाचे ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध सिद्ध झालेले नाहीत हे हायकोर्टाने मान्य केले असल्याचे आई संध्या चक्रवर्ती यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
अमेरीकेतील लाखोंची नोकरी सोडून आली शेती करायला, आज मोठमोठ्या हाॅटेल्सला जातात उत्पादने
सरकारी अधिकारी असूनही आठवड्यातील एक दिवस करतेय शेतीत कष्ट; कारण ऐकून हैराण व्हाल
कौतुकास्पद! दुष्काळग्रस्त भागात पठ्ठ्याने केली अशी आयडीया की अख्ख गाव झालं दुष्काळमुक्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.