प्रेमात दीड वर्षानंतर लोक एकमेकांना मारायला सुरुवात करतात; रीया सांगतेय महेश भटला

मुंबई | सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला २ महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरीही पोलिसांना त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण सापडले नाही. आता ही केस सीबीआयकडे देण्यात आली आहे.

तसेच आता रिया आणि महेश भट यांचा जलेबी सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यानचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये रिया प्रेमाविषयीचे तिचे मतं मीडियासमोर बोलताना दिसतेय.

याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांच्याशिवाय ‘जलेबी’ चित्रपटाचा हिरो वरुण मित्रासुद्धा दिसतो आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये रिया म्हणत आहे की, ‘प्रेमात दीड वर्षानंतर लोक एकमेकांना मारायला सुरुवात करतात. प्रेमात लोक काही महिन्यानंतर बदलून जातात, पण आता प्रेमाविषयी लोकांची विचारसरणी बदलली आहे.’

‘कारण आजच्या काळात प्रेम खरं आणि गहिरे होते, म्हणूनच मला वाटतं की कदाचित मी संपूर्ण आयुष्य अविवाहित राहणार आहे,’ असं रियाने म्हंटल आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.