हिला लाजवाटली पाहिजे; गरजू व्यक्तीची मदत करणारी रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर झाली ट्रोल; पहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या वर्षी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामुळे खुप चर्चेत आली होती. त्यावेळी तिला आयुष्यातल्या अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ती सोशल मीडियावरही जास्त सक्रीय नव्हती.

तसेच रिया पब्लिक प्लेसमध्येही जास्त दिसून येत नव्हती. पण आता सर्वकाही ठिक होताना दिसून येत आहे. नुकतीच रिया एका सलूनमध्ये दिसून आली होती. यावेळी तिने व्हील चेअरवर बसणाऱ्या एका गरजू व्यक्तीला मदत केली होती. त्यानंतर तिने फोटोग्राफरला पोज दिल्या होत्या. पण लोकांनी यावरही तिला ट्रोल केले आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याचे चाहते रिया चक्रवर्तीवर खुप नाराज होते. तसेच गेल्यावर्षी रियाला अनेक पोलिस चौकशींचा आणि आरोपांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने बाहेर येणे जाणे बंद केले होते.

अशात काही दिवसांपासून रिया आता पब्लिक प्लेसवर दिसून येत आहे. रिया सलूनमध्ये दिसून आली होती. तेव्हा तिने व्हिल चेअरवर असलेल्या एका गरजू माणसाला मदत केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडिओवर लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

लोकांनी रियाला ट्रोल केले आहे. सुशांत सिंग राजपुतच्या प्रकरणावरुनही काही लोकांनी तिच्यावर टीका केली आहे. फक्त फोटोसाठी उभी आहे. लाज वाटली पाहिजे, असे एका युजर्सने कमेंटमध्ये म्हटले आहे.

रिया चक्रवर्ती नुकतीच रुमी जाफरीची मुलगी अलफियाच्या मेहंदीमध्ये दिसली होती. रिया रुमी जाफरी दिग्दर्शित चेहरे फिल्ममध्ये दिसणार आहे. सुशांतच्या निधनानंतर ती सोशल मीडियावर ऍक्टीव्ह नव्हती पण आता काही दिवसांपासून ती इन्स्टाग्रामवर ऍक्टीव्ह दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आपल्याच इतकी लोकसंख्या असणाऱ्या चीनची कामगिरी ऑलिम्पिकमध्ये भारतापेक्षा चांगली आहे”
धक्कादायक! फेक कॉल केल्यामुळे पोलिसांची तरुणाला मारहाण, तरुणाचा मृत्यू
‘आम्ही पॅकेज वाले नाही, असे बोलणाऱ्यांनीच आज पॅकेज जाहीर केले’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.