‘ये झुकी झुकी सी नजर’ या मालिकेतून टीव्ही जगात प्रसिद्ध झालेला अभिनेता अंकित सिवाच याने अलीकडेच त्याच्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचच्या घटनेबाबत खुलासा केला. अंकितने सांगितले की, त्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे.त्याला आठवले कि त्याच्याकडून कसे न्यूड फोटो मागवण्यात आले होते.(reveals-actor-from-yeh-zuki-zuki-si-nazar-on-casting-couch)
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये त्याला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. अंकितने सांगितले की, त्याच्या मूळ गावी मेरठहून दिल्लीला येणे त्याच्यासाठी खूप कठीण काळ होता. मुलाखतीत त्याने सांगितले की, त्या दिवसांत त्याच्याकडून अनेकदा न्यूड फोटोंची मागणी करण्यात आली होती.
टीव्ही अभिनेता अंकित सिवाचने २०१७ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याआधी त्याने १२ वर्षे दिल्लीत मॉडेलिंग केले आहे. जरी अंकित बराच काळ मॉडेलिंगमध्ये राहिला, परंतु एक वेळ अशी आली जेव्हा त्याने हा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला होता. अंकित सांगतो की, “हे जग पाहिल्यानंतर चार महिन्यांनीच मी मॉडेलिंग सोडण्याचा निर्णय घेतला. मला स्वतः विचार करण्याची किंवा बोलण्याची परवानगी नव्हती.
मी एक चांगला दिसणारा माणूस होतो ज्याला फक्त चांगले कपडे घालून फोटो काढायचे होते. मला नेहमी वाटायचं की प्रत्येकजण चांगला असतो, पण जेव्हा तुम्ही कमकुवत असता तेव्हा प्रत्येकाला तुमचा फायदा घ्यायचा असतो. तुम्हाला सगळे लोक राक्षसासारखे दिसू लागतात. तुम्हाला या राक्षसांकडे दुर्लक्ष करायचे असते, परंतु ते तुमचा फायदा घेतात आणि तुम्हाला सोडून जातात.”
कास्टिंग काउचबद्दल बोलताना अंकित पुढे म्हणाला की, “ज्या पार्टीत माझ्याकडे कोणतेही काम नसायचे तिथे मला जायला सांगितले जायचे. हा एक प्रकारचा छळ होता, कारण मी त्यासाठी तयार नव्हतो. अनेकवेळा अशा परिस्थितीने त्रासून मला सर्व काही सोडून द्यावेसे वाटले होते. मी माझ्या परीने प्रयत्न करू शकलो असतो, पण जेव्हा ही गिधाडासारखी माणसं तुम्हाला टोचायला बसलेली दिसतात तेव्हा तुम्हाला रडावस वाटत आणि घरी जायचं मन होत.”
यामुळे तो खूप मानसिक तणावातून गेल्याचेही त्याने सांगितले. अंकितच्या म्हणण्यानुसार, तो रडला पण नंतर त्याला कळले की ज्याच्याकडे शक्ती आहे, तो आपल्याहून कमकुवत असलेल्या व्यक्तीचे शोषण करू इच्छितो हा मानवी स्वभाव आहे. तो म्हणाला, “हे फक्त मॉडेलिंगच नाही तर प्रत्येक उद्योगात घडते.
अशा लोकांना तुम्ही टाळू शकत नाही. मला तडजोड करण्याच्या अनेक ऑफर मिळाल्या. मी अशा अनेक अभिनेत्यांची उदाहरणे देऊ शकतो. कोणी कोणावर जबरदस्ती करू शकत नाही यावर अंकितचाही विश्वास होता. आपल्यावर कधीही शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला नसल्याचेही त्याने सांगितले.