‘१०० हून जास्त खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार करणार परत’

मुंबई | शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याचे आश्वासन देऊनही अद्याप सरकारी नोकरी न मिळाल्याने राज्यभरातील जवळपास ३० खेळाडुंनी पुरस्कार मागे देण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली आहेत.

क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्षभरापूर्वी राज्य सरकारने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान केले. यावेळी त्यांना शासकीय नोकरी सामावून घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने राज्यातील जवळपास १०० हून अधिक खेळाडूंनी हे पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले आहे.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याचा प्रस्तावावर गेल्या दोन वर्षांपासून निर्णय झालेला नाही. याबाबत गेल्या वर्षी खेळाडूंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मात्र अद्यापही यावर काहीही निर्णय झाला नाही.

दरम्यान, अद्यापही निर्णय न झाल्याने खेळाडूंनी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयात निवेदन दिले असून १९ फेब्रुवारी पर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास २४ फेब्रुवारीला शिवछत्रपती पुरस्कार शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
संभाजी ब्रिगेडचा इशारा; ‘पडळकरांना आता आम्ही सोडणार नाही…’
मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील मैदानात
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत; होणाऱ्या नवऱ्याला आहे एक मुलगी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.