पैसे खात नाही असा अधिकारी-कर्मचारी पोलीस दलात नाही- निवृत्त IPS मीरा बोरवणकर

मुंबई ; सध्या राज्यात राजकीय वातावरण फारच तणावपूर्ण आहे. एकीकडे विविध घटनांवरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तींवर चर्चा सुरु झाली आहे.

अशातच निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक दावा केला आहे. बोरवणकर यांच्या या विधानाने पुन्हा पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. त्या याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होत्या.

‘पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. एकही पोलीस स्टेशन नाही कि जिथे पैसे जमा होत नाहीत. तसेच पुढे बोलताना त्यांनी स्वतःचा किस्सा सांगितला. प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे.

राजकारणी लोकांना हव्या तश्याच नियुक्त्या होतात. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेल्यानंतर परिस्थिती बिघडत गेल्याचे बोरवणकर म्हणाल्या. याचबरोबर त्यांनी बोलताना त्यांनी पोलीस प्रशासनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

दरम्यान, सचिन वाझे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला त्या म्हणाल्या, ‘वाझे यांनी हे एकट्याने केले असेल हे शक्य नाही.’ त्यांच्या मागे मोठे पाठबळ असणार. क्राईम ब्रँच हे खंडणी वसुली केंद्र झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून याची न्यायालयान चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बाबोव! टॉयलेट सीटवर बसताच खालून आला अजगर, पुढं जे घडलं..; पहा व्हिडीओ

..तर राज्यात भाजप राष्ट्रवादीचे सरकार येऊ शकते- नारायण राणे

आनंद महिंद्रांनी लॉकडाऊनवरून राज्य सरकारला सुनावले परखड बोल; म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.