शनिवारी इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२२ चा मेगा लिलाव बंगळूर येथे पार पडला. या लिलावात खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडला. आयपीएल २०२२ च्या लिलावात डावखुरा फलंदाज इशान किशन(Ishan Kishan) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने इशान किशनला १५ कोटी २५ लाख रुपयांमध्ये विकत घेतले.(retired cricketer sunil gavskar statement on uncaped player auction price)
या लिलावामध्ये अनकॅप्ड खेळाडूंवर देखील चांगली बोली लावण्यात आली. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे ते खेळाडू ज्यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात आवेश खान या अनकॅप्ड खेळाडूवर १० कोटींची बोली लावण्यात आली. आवेश खान या खेळाडूला लखनऊ सुपर जाईंट्स या संघाने १० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले.
अनकॅप्ड खेळाडूंच्या आयपीएल पगारावर मर्यादा असली पाहिजे, असे मत महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. महान फलंदाज सुनील गावस्कर यांना अनकॅप्ड खेळाडूंना मिळणाऱ्या पगाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, आयपीएलच्या नियमांमध्ये शिथिलता आणून अनकॅप्ड खेळाडूंची मर्यादा एक कोटी रुपये ठेवावी, असे गावस्करांनी बीसीसीआयला सुचवले आहे.
आयपीएलमध्ये असे अनेक अनकॅप्ड खेळाडू आहेत, ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली आहे. ऋषभ पंतपासून इशान किशनपर्यंत, पृथ्वी शॉपासून शुभमन गिल, कृणाल पांड्या आणि कृष्णप्पा गौतमपर्यंत असे अनेक खेळाडू गेल्या काही वर्षांत आयपीएल लिलावात दिसले होते. ज्यांना टीम इंडियाकडून संधी मिळण्याआधीच आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळाली होती.
आयपीएलच्या मागच्या लिलावात कृष्णप्पा गौतमला चेन्नई सुपर किंग्सने ९ कोटींहून अधिक किमतीत विकत घेतले आणि त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या लिलावात शाहरुख खान, आवेश खान, राहुल तेवतिया आणि शिवम मावी या खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावण्यात आली. पण गावस्कर अशा नव्या खेळाडूंवर मोठा खर्च करण्याच्या बाजूने नाहीत.
१९ वर्षांखालील खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये १ कोटी रुपयांची कॅप असावी, असे गावस्कर यांनी सुचवले आहे. गावसकर यांनी लिहिले की, ‘एका रात्रीत मिळालेल्या आर्थिक यशामुळे ह्या खेळाडूंचं टॅलेंट खराब होऊ शकतं. त्यांच्यातील स्वतः चा खेळ उंचावण्याची भूक संपू शकते. त्यामुळे अनकॅप्ड खेळाडूंसाठी १ कोटी रुपयांची मर्यादा निश्चित केली जावी. जेणेकरून त्यांना कळेल की पुढे जाण्यासाठी आणि अधिक कमाई करण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या :-
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या सेटवरून समोर आला नवा फोटो; एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसून आले रणबीर-आलिया
‘क्या से क्या हो गये देखते देखते’ म्हणत रितेश-जेनेलियाने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शेअर केला व्हिडिओ
दीपिकाच्या ‘गेहराइयां’ चित्रपटावर रणवीर सिंहने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, मला तुझा..





