तुझे करिअर संपवल्याशिवाय शांत बसणार नाही! अभिनेत्याची सलमान खानला धमकी

बॉलीवूडमधील मोठे नाव म्हणजे सलमान खान. अनेक चित्रपट तो करत असतो. तसेच अनेकांना तो कामही देतो. त्याच्याची शक्यतो कोण पंगा घेत नाही. पण, यावेळी मात्र एका अभिनेत्याने सलमानलाच धमकी दिली आहे. यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तो म्हणतो की, सलमान तू भलेही बाॅलिवुडचा गुंड असशील, पण यावेळी तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहेस. तुझे करिअर संपविल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बॉलीवूडच्या भाईला धमकी दिल्यामुळे ही चर्चा सोशल मीडियावर चांगलाच रंगली आहे.

अभिनेता कमाल आर खान केआरके हा नेहमीच आपल्या भूमिकांमुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. तो म्हणाला, बाॅलिवुडचा गुंड भाई तू, एक लक्षात ठेव मी भलेही आऊटसायडर आहे. पण, मी सुशांत सिंह राजपूत नाही. ना आत्महत्या करणार आहे ना मी बाॅलिवुडला जिंकू देणार. यावेळी तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे.

आम्ही उत्तरप्रदेशचे आहोत, हार कधीच मानत नाही. आता तर आरपारची लढाई होईल. बाॅलिवुडच्या इतिहासात या लढाईचा उल्लेख केला जाईल. मी तुमच्या आव्हानांचा स्वीकार करतोय, असे बोलत केआरके आव्हान देखील स्वीकारले आहे.

तो राजकारणी, बाॅलिवुडमधील सेलेब्रिटिंवर सतत टीका करत असतो. केआरके विरोधात अनेक सेलेब्रिटींनी मानहानीचे दावे ठाकले आहेत. पण, केआरके मागे सरलेला नाही. तो म्हणतो की, तुम्हाला जे करायचे ते करा, तुमची संपूर्ण ताकद पणाला लावा, पण तुम्ही मला हरवू शकणार नाही.

आता सलमान खान काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. यामुळे बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

ताज्या बातम्या

काय सांगता! इस्राईलमध्ये सापडले 1000 वर्ष जुन्या कोंबडीचे अंडे, मात्र पुढे असं झालं की…

शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकासोबतच..; आजी आजोबांचा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येईल

कुठं गेली माणुसकी! वृद्ध वाहून जात होता आणि ग्रामस्थ व्हिडीओ काढत होते, पहा भयानक व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.