महाराष्ट्रात राहायचं तर मराठी व महाराष्ट्राचा सन्मान करावा लागेल;सानूंनी बेताल पोराला सुनावले

बिग बॉस १४ मधून बाहेर आल्यानंतर जान कुमार सानू आणि त्याचे वडील कुमार सानू यांच्यातील वाद उघड उघडकीस आला आहे. मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल त्याचे वडील कुमार सानू यांनी मुलाच्या संगोपनवर प्रश्नचिन्ह उभे केले. यावर वाद पेटला त्यानंतर मुलानेही कुमार सानूवर आरोप केले. आता कुमार सानू यावर संतापून म्हणाले यापुढे इच्छा असतानाही मी जानला भेटणार नाही.

“मी जानसाठी काहीच केले नाही असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे मला खूप वाईट वाटतेय. २००१ मध्ये माझा घटस्फोट झाला तेव्हा तो खूप लहान होता. त्यामुळे त्याला काहीच आठवत नसेल. त्यावेळी त्याच्या आईने मागितलेली प्रत्येक गोष्ट मी त्यांना दिली आहे. मी माझा आशिकी बंगला देखील त्यांना दिला. जानला मी अनेकदा भेटलो होतो. पण यापुढे इच्छा असतानाही मी त्याला भेटणार नाही.” असे कुमार सानू यांनी स्पष्ट केले.

“सर्वातआधी तर सर्वांनी तो व्हिडीओ बघावा. मी त्यात संगोपन असा शब्दही वापरलेला नाही. मी केवळ हे म्हणालो की, नालायक गोष्टी करू नये. नालायक गोष्टी, मी त्याला नालायक म्हणालो नाही. दुसरी बाब म्हणजे महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आणि महाराष्ट्राचा सन्मान करावा लागेल आणि हे त्याला शिकवलं पाहिजे. मी हेच म्हणालो होतो. आता तो म्हणतोय की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी काहीच केलं नाही तर मला याचं वाईट वाटलं आहे.”

“एक वडील म्हणून त्यांनी माझी कधी जबाबदारी स्वीकारली नाही. आता यावर कुमार सानू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुमार सानू यांना मुलाच्या या वक्तव्याचं फार वाईट वाटलं आहे. ते म्हणाले की, आशिकी बंगला ते महेश भट्ट यांना भेटवण्यापर्यंत मी जानसाठी खूप काही केलं आहे”. असे कुमार सानू म्हणाले.

पूर्वी जान केवळ कुमार सानूचा मुलगा म्हणून ओळखला जात असे. पण बिग बॉसने जान सानूला आपली कला आणि व्यक्तिमत्त्व जगासमोर दाखविण्याची संधी दिली.

जवान शहीद झाल्याच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नाही; अख्या गावावर दु:खाचा डोंगर

शिवसेनेचा वाघ विरोधकांवर गरजला, तुम्ही एक सूड काढाल आम्ही १० सूड काढू, पहा व्हीडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.