मोठी बातमी! नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई | राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बऱ्याच दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे कोणाकडे जाणार यावर चर्चा सुरू होती. आता या पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते आहे. यामुळे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यात दिल्लीला यानिमित्ताने यश आले आहे. नाना पटोले यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी अनुकूल असले तरी राज्यातील इतर नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांचे नाव लावून धरले होते.

दरम्यान, काँग्रेसचे विद्यामान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याच्या तयारीत होते. बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला या पदावरुन मुक्त करावे अशी विनंती दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे केली होती यामुळे नवीन नावाची चर्चा राज्यात सुरू होती.

यानंतर आज (गुरुवारी) नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्षांना आपला राजीनामा सोपवला आहे. तसेच त्यांनी पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल. असं नाना पटोले यांनी यापुर्वी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
कंगना पुन्हा बरळली; भारतीय क्रिकेटर्संना म्हणाली धोबी का कुत्ता
किती ते प्रेम! जेनेलियाने चावला रितेशचा कान, म्हणते प्रेमात पुर्णपणे वेडी झाली आहे; पाहा व्हिडीओ
‘दिल्ली हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा पूर्वनियोजित कट’
रेणूनंतर करूणा शर्माने केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाले….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.