‘रंग माझा वेगळा’ मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस; फोटो पाहून विश्वास बसनार नाही

‘रंग माझा वेगळा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका घराघरात जाऊन पोहचली आहे. या मालिकेचे प्रचंड चाहते पाहायला मिळतात. आजही बऱ्याच ठिकाणी समाजात वर्णावरून भेदभाव केला जातो. हीच गोष्ट लक्षात ठेवून काही गोष्टींवर आधारित ही मालिका आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. रेशमाच्या अभिनयाचे कौतुक होताना सर्वत्र पाहायला मिळते. या मालिकेतील दीपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी दाखवण्यात आले आहे. परंतु रेश्मा खऱ्या आयुष्यात मात्र खुच ग्लॅमरस आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे सोशल मिडीयावर खूप सक्रीय असेलेली पाहायला मिळते. ती सतत आपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. इंक्यातच तिने तिचे काही फोटोज सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेविषयी बोलायचं झाल तर आता मालिका एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहचली आहे. मालिकेत कार्तिकने दीपाच्या चरित्रावर संशय घेतल्यामुळे सध्या दीपा घर सोडून गेली आहे. तसेच कार्तिक तिच्यासोबत डिवोर्स घेण्याच्या तयारीत आहे.

तसेच एकीकडे दीपा आपल्या मुलांसाठी नव्याने आणि जोमाने नवीन कामाला सुरवात करत आहे तर दुसरीकडे कार्तिकच्या आयुष्यात एका नवीन मुलीची एंट्री दाखवली आहे. आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगाला जाऊन पोहचली आहे की, ती नवीन मुलगी नक्की कशासाठी आली असणार आहे तसेच दीपा पुन्हा कधीच कार्तिकच्या आयुष्यात येणार नाही का?

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने याआधीही अनेक नावाजलेल्या मालिकांमध्ये काम केले होते. रेश्मा ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. कलर्स मराठीवरील ‘चाहूल’ या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती. रेशमाने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं पाहायला मिळतंय. तिने ‘केशरी नंदन’ या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच ती ‘लालबागची राणी’ या चित्रपट देखील पाहायला मिळाली.

हे ही वाचा-

२६ महिन्यांचा हा मुलगा असा क्रिकेट खेळतोय, विराट कोहलीही पडतोय फिका, बघा विडिओ

मोठी बातमी! मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे राजीनामा देण्याची शक्यता

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.