“वर्षानुवर्षे ज्यांनी आरक्षण घेतले आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवे”

मुंबई । राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता मराठा आरक्षणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे वक्तव्ये केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या सरकारच्या गोष्टी आहेत. मराठा आरक्षण प्रकरण सु्प्रीम कोर्टात आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. मात्र जातीय आधारावर आरक्षण नसावे अशी भूमिका दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उघडपणे घेतली होती. अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.

व्यक्ती कोणत्याही जाती, धर्माचा असो, गरीब गरजू नागरिकांना आरक्षण मिळायला हवे ही बाळासाहेबांची भूमिका होती. मागासवर्गींयांमध्ये वर्षानुवर्षे ज्यांनी आरक्षण घेतले आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत हे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने ‘शट अप यार कुणाल’ या पॉडकास्ट मध्ये घेतलेल्या बहुप्रतीक्षित मुलाखतीत बोलत होते. कंगना रणावत आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु असतानाच त्यांनी मुलाखतीचे निमंत्रण स्वीकारत कुणालला मुलाखत दिली होती.

सरकार स्थापनेमध्ये राऊतांची असलेली महत्वाची भूमिका, लॉकडाऊन काळात शरद पवारांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत, सुशांत केस, कंगना प्रकरण यावर संजय राऊत आपली काय भूमिका मांडणार यासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेला कुणाल काय प्रश्न विचारणार यावरून चांगलीच उत्सुकता लागली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.