मुंबई | राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यासाठी यापुर्वी जाहीर केलेली आरक्षण सोडत आयोगाने रद्द केली होती. तसेच नवीन आरक्षण सोडत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर होणार होती. आता २२ जानेवारीला सरपंच पदाची ही आरक्षण सोडत घोषित केली जाणार आहे.
भाजप सरकारने सरपंच, नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून निवडणुका घेतल्या होत्या. याउलट आता निवडून आलेले सदस्य सरपंचाची निवड करतील असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे आपल्या गावासाठी नव्याने होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ठिकठिकाणच्या ग्रामपंचायती निवडणुक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न केले गेले. यानंतर आता १५ जानेवारीला मतदान आणि १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. तसेच याबाबत २२ जानेवारीला सरपंच पदाची नवी आरक्षण सोडत घोषित होईल.
आरक्षण सोडत प्रत्येक तालुक्याच्या आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आशेवर असणाऱ्यांना निवडणुक निकाल आणि त्यानंतर २२ जानेवारीची वाट पहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गाव पुढाऱ्यांनो लागा तयारीला! ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा बदल; सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर
उदयनराजेंचा शब्द राखला! साताऱ्यामधील तब्बल १२३ ग्रामपंचायती बिनविरोध