एकेकाळी भीक मागून दिवस काढत होता, आज कमावतोय करोडो; ॲमेझाॅन, वालमार्ट आहेत क्लायंट

अपयश आलं म्हणून खचून न जाता त्यावर मात करून यश गाठण्याचं स्वप्न बाळगून कोट्याधीश झालेले अनेक माणसं आपण पाहिलेत. आज आपण अश्या माणसाची गोष्ट पाहणार आहोत जो एकेकाळी भीक मागुन खायचा आणि आज करोडोच्या कंपनीचा मालक आहे.

आजची गोष्ट रेणुका आराध्य यांची आहे. ज्यांनी गरिबी आणि संघर्ष या दोन्हीवर मात करून एक कंपनी उभी केली. आणि आज तीच कंपनी आज १५० लोकांना रोजगार देत आहे. रेणुका यांचा जन्म बंगळुरु येथील एनेकाल तालुक्यातील गोपासंद्र गावात झाला. त्यांचे वडील राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या स्थानिक मंदिराचे पुजारी होते.

मात्र त्यांना कोणतंही आर्थिक मानधन दिलं जात नव्हतं. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी रेणुका आराध्यच्या वडिलांना आसपासच्या गावात भिक्षा मागावी लागत असे, त्यांच्या या कामात रेणुकानेही साथ दिली. भिक्षेमध्ये लोकांनी दिलेल्या अन्नधान्यावर त्यांचे कुटुंब जगत होते.

आराध्य कुटुंबातील रेणुका हे सर्वात लहान होते. त्यांचा मोठा भाऊ बंगळुरूला शिकायला गेला. पण रेणुका कुटुंबासोबत राहून शिकत होते. १२ व्या वर्षात त्यांनी घरात मदतनीस म्हणून काम केले होते. त्यानंतर काही वर्षानंतर वडिलांनी रेणुका यांचा प्रवेश १० वीच्या वर्गात घेतला. त्यांच्याकडे फी द्यायला पैसे नव्हते, त्यामुळे शिक्षक ती फी भरायचे. त्या बदल्यात रेणुका यांच्याकडून घरातील काम करवून घ्यायचे.

मोठे झाल्यावर काम केले तरी त्यांना यश मिळत नव्हते. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. तीन वर्ष विविध कंपन्यात काम करत असताना त्यांच्या डोक्यात काहीतरी सुरु करण्याचा विचार घोंगावत होता. अशातच त्यांनी सुटकेस, वॅनिटी बॅग बनवण्याचा उद्योग सुरु केला. मात्र काही काळानंतर हा उद्योग बंद पडला.

रेणुका आराध्य यांचे गुंतवणूक केलेले सर्व पैसे बुडाले. घरची जबाबदारी आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ड्रायव्हर बनण्याचं निश्चित केले. त्यानंतर लग्नाची अंगठी विकून त्यांनी गाडी शिकली आणि वाहन परवाना काढला.

नंतर रेणुका एका वाहतूक कंपनीत चालक म्हणून नोकरीस लागले. ही कंपनी मृतदेह वाहतूक करण्याचे काम करत होती. त्यानंतर एक दिवस त्यांना कामानिमित्त एका कंपनीत जावे लागले. तिथे त्यांना बाहेरच थांबावे लागले, ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली. त्यानंतर त्यांनी ठरवले की, आपणही एक कंपनी काढायची, जिथे सर्वांना सन्मान मिळेल.

२००० मध्ये त्यांनी इकडून-तिकडून पैशांची सोय करून गाडी खरेदी केली. काही वर्षांनंतर त्यांनी सहा टॅक्सी आणि १२ चालक ठेवले, ते १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत होते. एकाने २००६ मध्ये मंदीमुळे ‘इंडियन सिटी टॅक्सी’ नावाची कंपनी विकायला काढली होती. त्यांनी त्या संधीचे सोने केले.

नंतर रेणुका यांनी सर्व टॅक्सी विकून ती कंपनी खरेदी केली. त्या कंपनीकडे ३० कॅब होत्या. या कंपनीची त्यांनी ‘प्रवासी कॅब’ नावाने नोंदणी केली. आणि त्यांचा पहिला ग्राहक अ‌ॅमेझॉन इंडिया होता. त्यानंतर काम वाढत गेल्यानंतर ३०० कॅब झाल्या. त्यांच्या ग्राहकांच्या यादीत LinkedIn, Walmart, Akamai, General Motors सारख्या दिग्गज कंपन्यांचे नाव आहे. सध्या त्यांच्या १३०० कॅब आहे. तसेच या कंपनीची वार्षिक उलाढाल ३८ कोटी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

फेकून दिलेल्या काचेच्या बाटल्यांपासून डेकोरेशनचे सामान बनवून कमवते लाखो; तुम्हीही शिका

द कारगील गर्ल! जिवाची बाजी लावत शेकडो सैनिकांचे प्राण वाचवणारी पहीली महीला पायलट

भल्या भल्यांना जमला नाही तो विक्रम फक्त २० धावा करत कृणाल पांड्याने आपल्या नावावर केला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.