सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मुंडेंवर झालेल्या आरोपांवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. यावर आता रेणु शर्मा यांच्या वकीलांनी गंभीर आरोप केले आहे.
“रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी दिली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेल.” असा आरोप रेणु यांच्या वकिलांनी मुंडेंवर केला आहे.
“तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही” अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप रेणूच्या वकीलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यावर अजुन मुंडेंनी प्रतिक्रिया दिली नाही.
रेणू शर्मा ही सध्या डीएन नगर पोलीस स्थानकांमध्ये असून तिचा जबाब नोंदवण्यात येत आहे. गेल्या चार तासापासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दरम्यान, माध्यमांनी रेणूच्या वकिलांशी चर्चा केली असता त्यांनी हा गंभीर खुलासा केला.
धनंजय मुंडे प्रकरणाला नवे वळण; रेणू शर्मा विरोधात माजी आमदाराने केली ‘ही’ तक्रार
बला.त्काराच्या आरोपानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे मीडियासमोर, राजीनाम्याबद्दल म्हणाले..
“धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, तर नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिक आरोप नाहीत”