रेनॉ कंपनीची भन्नाट ऑफर; फक्त १४०३ रुपयांच्या हप्त्यावर घरी घेऊन या रेनॉ क्वीड

दिल्ली | जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर रेनॉ कंपनीने सध्या एक भन्नाट ऑफर बाजारात आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही रेनॉची शानदार क्वीड गाडी फक्त १५०३ रुपयांच्या हप्त्यावर घरी घेऊन येऊ शकता.

या कारची सुरुवातीची किंमत २.९९ लाख रुपये इतकी आहे. या गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत ५. १२ लाख रुपये इतकी आहे. कंपनीने आणलेल्या नवीन ऑफरनुसार तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला १ लाख ९९ हजार ८०० रुपये डाऊन पेमेंट भरावे लागेल.

त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला १४०३ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तसेच या ऑफरवर तुम्हाला १ लाख रुपयांचा फायनान्स दिला जात आहे त्यावर ४.९१ टक्के व्याजदर आहे. १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ७ वर्षे म्हणजे ८४ महिने १४०३ रुपये हप्ता भरावा लागेल.

गाडीचे फीचर्स बघायचे झाले तर या गाडीमध्ये सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये १ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 68 पीएसचे पॉवर आणि 91 एनएम टॉर्क निर्माण करते. ५ स्पीड ऑटोमॅटिक इंजिन आहे.

सेफ्टीसाठी या गाडीमध्ये ड्रायव्हर, रिअर पार्किंग सेन्सर, ABS, EBD, सीट बेल्ट रिमाईंडर, ओव्हरस्पीड अलर्ट, रिअर डोर चाईल्ड लॉक, हाई माऊंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग देण्यात आले आहे. तसेच की लेस एन्ट्री सारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

आता माझी सटकली! उत्तर कोरियात कोरोनाचे नियम मोडले म्हणून व्यक्तीला गोळ्या झाडून केले ठार

अरे वा! या ठिकाणी मिळत आहे एलपीजी सिलिंडरवर ५०० रुपयांचा कॅशबॅक

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.