रेमो डिसोजाने सांगितली आठवण, म्हणाला, सुशांतच्या ‘या’ आठवणीने आजही अंगावर शहारे येतात

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने एका वर्षापूर्वी त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूला आता एक वर्ष पूर्ण होत आली आले आहे. असे असले तरी त्याच्या आठवणी अनेकांना येत आहे. त्याचे चाहते आजही त्याच्या आठवणीत भावूक होताना दिसतात.

आता फिल्ममेकर रेमो डिसोजाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांतने १४ जूनला आत्महत्या केली. सुशांतला रेमोसोबत डान्स फिल्म करायची होती. याबाबत आजही विचार करून रेमोच्या अंगावर शहारे निर्माण होत आहेत. रेमो डिसोजा आजही याबाबत खंत व्यक्त करतो.

मात्र सुशांतने आत्महत्या केली आणि सगळंच राहून गेले. सुशांत एक उत्तम डान्सर होता. सुशांत स्टेजवर गेल्यावर सगळ्यांना मंत्रमुग्ध करत असे. उत्तम कलाकार आणि उत्तम डान्सर देखील तो होता. सुशांत जेव्हा डान्स शो डान्स प्लसमध्ये आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकरता आला होता.

त्यावेळी त्यांच्यामध्ये बोलणे झाले होते. त्याने रेमोला सांगितले होते की, ‘चल एक डान्स सिनेमा तयार करू. आज रेमो त्यावर खंत व्यक्त करतो. मला तो सिनेमा बनवायला मिळाला असता तर बरे झाले असते. यामुळे तो भावूक होतो.

आजही ही गोष्ट रेमोला आठवते आणि त्याला प्रचंड वाईट वाटते. अनेकांना सुशांतने आत्महत्या केलीय यावर अजूनही विश्वास बसत नाही. अनेकजण त्याच्याबद्दल अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सुशांतचे जगभरात असंख्य चाहते आहेत. ते देखील सुशांतची आठवण काढत असतात. आता त्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. यामुळे अनेकांना त्याची आठवण येत आहे. सुशांतची अनेक स्वप्न अपूर्ण राहिली.

ताज्या बातम्या

यशस्वी होण्यासाठी रतन टाटा यांच्या ‘या’ गोष्टी आत्मसात करा, व्हाल करोडपती, जाणून घ्या..

अभिमानास्पद! खुल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

त्यादिवशी अंधश्रद्धेमुळे ९०० पेक्षा जास्त लोकांनी केली होती आत्महत्या; जाणून घ्या ‘त्या’ भयानक घटनेबद्दल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.