“यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना”- नितेश राणे

मुंबई | कोरोनाची लाट ओसरत नाही तोच तौत्के चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. या चक्रीवादळामुळे पश्चिम किनार पट्टीवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात तौत्के चक्रीवादळाच्या पाहणीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.

यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज कोकणात येऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी कोकणातील लोकांना  लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ. अशी घोषणा केली.

मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं की, यालाच म्हणतात lipstik दौरा.. मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही.. मोजून १० km आतच..

विमानतळावरचा आढावा..दौरा संपला!! ईथे फडणवीसजीं चा ७००kms चा झंझावात.. कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना!!! असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. यानंतर पुन्हा एक ट्विट  करत राणेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विभानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा मुख्यमंत्र्यांच्या आधी तीन दिवस कोकण दौरा केला आहे. यावेळी रायगड, सिंधूदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये फडणवीसांनी पाहणी केली होती.

या पाहणी दौऱ्याचे फोटो ट्विट करत आमचा नेता लय पॉवरफुल्ल !!! असं म्हणतं नितेश राणे यांनी फडणवीसांच्या पाहणी दौऱ्याचे कौतूक केले आहे. मुख्यमंत्री कोकणात यायच्या आधीही भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले होते. आता यावर शिवसेना काय उत्तर देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दोन दिवसात पंचनामे करून नुकसान भरपाई देणार- मुख्यमंत्री

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे दोन दिवसात पुर्ण करण्यात येतील. यानंतर  मदत जाहीर केली जाईल. मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले. यावेळीपाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री, अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-
केंद्र सरकारकडून तब्बल १ लाख LPG डिलिव्हरी सेंटर सुरू, सेंटर मिळवण्यासाठी असा करा अर्ज
राजकूमारने केला होता अभिनेत्री वहिदा रहमानचा अपमान; दुखी झालेल्या वहिदा रहमानच्या डोळ्यात आले पाणी
नांदेडमधील गुरुद्वारा कमिटीचा मोठा निर्णय! सोनं मोडून दवाखाने, मेडिकल कॉलेज उभारणार
भाजपने मराठ्यांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यावर तोडगा सांगावा; समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजीराजे आडवा येईल

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.