नैसर्गिकरित्या शरीरातील आॅक्सीजन लेव्हल वाढवण्यासाठी करा ‘हे’ नामी उपाय

मुलुखमैदान:कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शरीरातील अॉक्सिजन लेव्हल प्रत्येकाने मोजणे सुरू केले आहे. सरकारकडूनही घरोघरी जाऊन अॉक्सिजन लेव्हल तपासत आहे.

पण कोरोना हा एकच रोग असा नाही की ज्यात शरीरातील अॉक्सिजन लेव्हल कमी होते. तर हायपोक्सिया हा आजारही शरीरातील अॉक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर होतो. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. रक्तातून हा ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. हायपॉक्सिया म्हणजे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे.

हायपो (HYPO) म्हणजे कमी आणि अॅक्सिया (oxia) म्हणजे ऑक्सिजनच प्रमाण. श्वास घेण्यास त्रास होणे, तसेच कोंडल्यासारखा होणे हे हायपोक्सियाचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्वचेचा रंग बदलणे, गोंधळाची परिस्थिती कफ, हृदयाचे ठोसे अचानक वाढणे, जोर-जोरात श्वास घेणे, अचानक खूप घाम येणे ही लक्षणे आहेत.

ताणतणावाचे व्यवस्थापन करणे, योगा करणे, प्रसन्न राहणे, मेडिटेशन करणे, तसेच व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेशींना अॉक्सिजन लेव्हल व्यवस्थित मिळते. भरपुर पाणी पिणे गरजेचे आहे.

भरपूर पाणी पिल्याने शरीरातील कोरडेपणा कमी होऊन अॉक्सिजन लेव्हल वाढायला मदत होते. चौरस आहार घ्यावा. ताज्या, उकडलेल्या भाज्या, हिरव्या भाज्या, गवार, बीन्स खावे. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. यासर्व गोष्टींनी अॉक्सिजन लेव्हल वाढण्यास मदत होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.