रेमडेसिवीर मिळत नसेल तर ‘हे’ औषध द्या, डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले पर्यायी औषधाचे नाव

पुणे । राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध नाहीत. अशातच रेमडेसिवीर औषधाचा मोठा तुटवडा जाणवत असून यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत.

आता हे औषध मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर एक पर्यायी औषध सांगितले आहे. रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोरोना टास्क फोर्सने मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

यामध्ये डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे? लक्षात घ्या, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिले जाते. परंतु जर ते उपलब्ध झाले नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर हे सांगितले आहे.

हे औषध कोरोना रुग्णाला द्यावे. यामुळे रुग्ण बरा होण्यास मदत होणार आहे. शासन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील.

रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे, अशी माझी नम्र विनंती आहे, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.