रेमडीसीवीरसाठी खूप लोकांनी मागणी केली पण कोरोनील हवे ही मागणी कुणीच केली नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशामध्ये थैमान घातले आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले दिसून आले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पण वाढताना दिसून येत आहे.

ऑक्सिजन बेड, औषधे आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा देशात मोठ्या प्रमाणावर जाणवताना दिसून येत आहे. लोक सोशल माध्यमातून पण मोठ्या प्रमाणावर मदत करताना दिसत आहे.

कोणी औषधांसाठी तर कोणी ऑक्सिजनची मदत सोशल माध्यमातून करताना दिसून येत आहे. याच मदतीच्या संदर्भात प्रसिद्ध लेखक चेतन भगत याने बाबा रामदेव यांच्या पतंजलीला खोचक सल्ला दिला आहे.

चेतन भगत याने म्हटले आहे की, “हे खूप हास्यास्पद आहे पण खूप तातडीने कोरोनील हवाय असे एकही ट्विट पाहण्यात आले नाही” असे ट्विट त्याने केले आहे. कोरोनील हे औषध पतंजलीने बनवले आहे.

हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे पतंजलीच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोरोनील औषध रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कोरोना कालावधीमध्ये या औषधाने कोट्यवधी रुपये कमावल्याचे उदाहरण पुढे आली होती.

कोरोनील याच औषधावरून प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी बाबा रामदेव यांना खोचक सल्ला दिला आहे. चेतनच्या या ट्विटनंतर त्याला पण मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.