’18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलाला आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही, वानखेडेंची बाजू भक्कम’

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे वादात सापडले आहेत. समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते मंत्री नवाब मलिक रोज नवनवीन आरोप करत आहेत. आता यावर प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, एखादा मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर त्या मुलाला आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल दिला आहे. त्यामुळे एसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बाजू भक्कम असून या प्रकरणात त्यांच्याच बाजूने निर्णय येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

यामुळे त्यांनी वानखेडे यांची बाजू मांडली आहे. आता पुढे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंबेडकर म्हणाले, 26 फेब्रुवारी 2005 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. त्यानुसार एका व्यक्तिच्या वडिलांने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यावेळी या व्यक्तीने वडिलांचा धर्म नाकारला.

त्याने मदिगा जातीचे सर्टिफिकेट मिळावे अशी मागणी केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यावेळी त्याच्या आजोबा-पणजोबाचा धर्म ग्राह्य धरून त्या व्यक्तिला देण्यात आलेले मादिगा जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले. यामुळे वानखेडे यांची बाजू भक्कम मानली जात आहे.

तसेच या प्रकरणात कुळातून त्याला बाहेर काढले नाही. कुळानेच त्याला धर्माचा अधिकार दिला आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार घटनेप्रमाणे येणाऱ्या जातीत त्याला अभय देण्यात आले. तसेच वयाच्या 18 व्या वर्षानंतर व्यक्तिला आई-वडिलांचा धर्म लागू होत नसल्याचे या निकालात स्पष्ट करण्यात आले.

त्यामुळे समीर वानखेडे यांना आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. याबाबत नवाब मलिक अनेक पुरावे देत आहेत. त्यांची नोकरी ही गैरमार्गाने मिळवली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.