Share

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांकडून कोर्टात महत्त्वाचं प्रतिज्ञापत्र

Disha Salian Death Case:  दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. तिचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी (Justice Ajay Gadkari) आणि न्यायमूर्ती राजेश पाटील (Justice Rajesh Patil) यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी पार पडली. कोर्टाने राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी अंतिम दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

दरम्यान, मालवणी (Malvani) पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर (Shailendra Nagarkar) यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती (accidental) असून, तपासात कोणताही गुन्हा किंवा घातपात आढळलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची गरज नाही, असं स्पष्ट करत त्यांनी याचिका फेटाळण्याची विनंती केली.

आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेप याचिकेवर टीका

सतीश सालियन यांच्यावतीने वकील निलेश ओझा (Advocate Nilesh Ojha) यांनी आदित्य ठाकरेंनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर उत्तर सादर करत म्हटलं की, आदित्य ठाकरे हेच या प्रकरणात मुख्य आरोपी असून त्यांना याचिकेचा हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे त्यांची याचिका फेटाळावी, अशी मागणी केली गेली.

राज्य सरकारकडून वेळ मागितली

सरकारी वकील प्राजक्ता शिंदे (Prajakta Shinde) यांनी कोर्टाकडे विनंती करत सांगितलं की, CBI तपासाबाबत भूमिका ठरवण्यासाठी थोडा अधिक कालावधी द्यावा. कोर्टाने ही विनंती मान्य करत पुढील सुनावणीसाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

याचिकेतील गंभीर आरोप काय?

सतीश सालियन यांच्या याचिकेत दावा करण्यात आला आहे की, दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार (gang rape) करून तिला इमारतीवरून फेकण्यात आलं. त्यांच्या मते, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar – शिवसेना), मालवणी पोलीस अधिकारी, आणि इतरांनी त्यांच्या कुटुंबावर दबाव आणला होता. दिशा मृत्यूनंतर शवविच्छेदनात 50 तासांचा विलंब, सीसीटीव्ही फुटेज गायब होणं, मोबाईल लोकेशन नोंदी न ठेवणं, घाईघाईत अंत्यसंस्कार हे सगळं संशय वाढवणारं आहे.

आदित्य ठाकरेवर थेट आरोप

याचिकेत दावा करण्यात आला आहे की, 8 जून 2020 च्या रात्री दिशाच्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली (Sooraj Pancholi), दीनो मौर्या (Dino Morea) आणि इतर मंडळी अचानक आले. याच रात्री दिशा सालियनवर कथित बलात्कार झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच, दिशा मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी काही पोलिस अधिकाऱ्यांना आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला 44 वेळा फोन केल्याचा उल्लेखही याचिकेत आहे.

या प्रकरणाचा CBI किंवा NIA मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलिस अधिकारी आणि डॉक्टर यांच्यावर नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाई डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणीही पुढे आली आहे. याशिवाय, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांची चौकशी व्हावी, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now