रिलायन्सचे मिशन ऑक्सिजन; रोज १००० टनाहून जास्त ऑक्सिजनची निर्मिती; राज्यांना मोफत वाटप

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालयात ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी अनेक उद्योगपती मदतीसाठी धावून येत आहे.

आता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकिची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने मिशन ऑक्सिजनला सुरुवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या जामनगर ऑईल रिफायनरी प्रकल्पामध्ये दररोज १००० टनांपेक्षा जास्त मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची निर्मिती करत आहे.

कोरोनामुळे अनेक राज्यांचे नुकसान झाले आहे. त्या राज्यांना हे ऑक्सिजन विनामुल्य देण्यात येणार आहे. रिलायन्स आज भारताच्या मेडिकल ग्रेडच्या सुमारे ११ टक्के ऑक्सिजनचे उत्पादन करत आहे. इतकेच नाही तर दर दहा रुग्णांपैकी एकाला हे ऑक्सिजन दिले जात आहे.

यावेळी मुकेश अंबानी स्वत: मिशन ऑक्सिजनच्या कामांवर लक्ष ठेवताना दिसून येत आहे. त्यांच्या नेत्वृत्वातच रिलायन्स दुहेरी रणनितीवर काम करताना दिसून येत आहे. त्यामध्ये पहिली रणनिती म्हणजे जामनगरमधील रिलायन्सची रिफायनरी प्रक्रिया बदलून अधिक ऑक्सिजन तयार करुन जास्तीत जास्त रुग्णांचे जीव वाचवणे.

तसेच दुसरी रणनिती अशी आहे, की लोडिंग तसेच वाहतूक क्षमतांमध्ये वाढ करणे. म्हणजेच जेणे करुन गरजू राज्यांमध्ये सुरक्षितपणे ऑक्सिजनची वाहतूक करता येऊ शकेल.

रिलान्सने खुप कमी वेळात मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचे उत्पादन शुन्यावरुन १००० मे. टन केले आहे. वाढत्या ऑक्सिजन निर्मितीमुळे दिवसाला दररोज १ लाख रुग्णांना श्वास घेणे शक्य होत आहे. विशेष म्हणजे रिलायन्सने एप्रिल महिन्यात १५ हजार टनपेक्षा जास्त आणि महामारी सुरु झाल्यापासून ५५ हजार टनपेक्षा जास्त ऑक्सजनची निर्मिती केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बंगालच्या वाघिनीने उडवला भाजपचा धुव्वा; ममतांच्या तृणमूलची विजयी आघाडी
पोलार्डच्या वादळात चेन्नई भूईसपाट; मुंबईच्या वाघाने चेन्नईच्या तोंडातील विजय खेचून आणला
वडिलांच्या ‘या’ अंतिम इच्छेसाठी आनंद शिंदे यांनी मोडले होते पत्नीचे दागिने, किस्सा वाचून भावुक व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.