कोरोना लढ्याला रिलायन्सकडून मोठे बळ; कोरोना योद्ध्यांसाठी देणार मोफत पेट्रोल डिझेल

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. यात अनेकांना ऑक्सिजन बेड औषधे मिळत नाहीत यामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहे.

आता अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये रिलायन्सकडून आता मोठ्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर कोरोना रुग्णवाहिकेसह ऑक्सीजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोफत डिझेल दिले जाणार आहे

रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीच्या वतीने मोफत डिझेल देण्याचा उपक्रम अनेक पेट्रोल पंपावरुन सुरू करण्यात आला. या योजनेत कोरोना बाधित रुग्ण घेवून जाणार्‍या रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनासाठी दररोज ५० लिटरपर्यंत मोफत डिझेल देण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासन अथवा जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या अधिकृत पत्राद्वारे नोंदणीकृत क्रमांकाच्या गाड्यांना ही सुविधा दिली जाणार आहे. सरकारी अथवा खाजगी हॉस्पिटल रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना कंपनीच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर या सुविधेचा लाभ घेता येईल.

केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील ही सुविधा दिली जाणार आहे. संगमनेरमध्ये याची सुरुवात करण्यात आली. कोरोना लढ्यात सरकारला मदत करण्याची एक वेगळी सुरुवात रिलायन्सकडून करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करतोय, अनेक उद्योगपती, खेळाडू, बॉलीवूड कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेकांनी ऑक्सिजन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच अनेकांनी आपापल्या परीने मदत केली आहे. यामुळे अनेकांना मोठी मदत झाली आहे.

नीता अंबानी, सलमान खान यांनी मुंबईमध्ये अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची जेवणाची सोय केली आहे. यामुळे आता मदतीसाठी अनेकांचे हात पुढे येत आहेत. यामुळे या लढ्याला आता बळ येणार आहे.

ताज्या बातम्या

ममता सरकारमधील मंत्र्याच्या घरावर सीबीआयची धाड; मंत्र्यासह दोन आमदारांना घेतले ताब्यात

गोमूत्र पिल्यामुळे मला कोरोना झाला नाही; भाजप खासदाराचा दाव्याने उडाली खळबळ

अरे बापरे! ‘हा’ कर्मचारी आईसक्रिम टेस्ट करण्यासाठी घेतो करोडो रुपये; वाचा त्याच्याबद्दल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.