“अर्णब गोस्वामींची सुटका करा, आणि ‘त्या’ पोलिसांचे निलंबन करा

मुंबई । राज्यात अर्णव गोस्वामी अटक प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप एकमेकांवर टीका करत आहेत. आता भाजपचे आमदार राम कदम यांनी उपोषण सुरू केले आहे.

अर्णब गोस्वामींची सुटका करा आणि पोलिसांचे निलंबन करा अशी मागणी करत राम कदम यांनी काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळला. तसेच मंत्रालयाच्या समोर गांधी स्मारकासमोर उपोषण करणार असल्याचंही राम कदम यांनी सांगितले आहे.

यावेळी ते म्हणाले, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारितेवरील हल्ला आहे. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या या अप्रत्यक्ष आणीबाणी विरोधात उपोषण करणार असल्याची घोषणाही राम कदम यांनी केली आहे.

या प्रकरणानंतर राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपले लाक्षणिक उपोषण सुरूच राहील, असे त्यांनी म्हटलेले आहे. या प्रकरणी केंद्र आणि राज्यात वाद सुरू आहे.

अर्णब सुटकेसाठी प्रयत्न करत असून कोर्टाकडे त्याने जामिनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.