हिंदू मुलासोबत लग्न करणाऱ्या मुस्लिम तरुणीला घरच्यांनीच दिली शिक्षा; सख्ख्या भावानेच केलं धक्कादायक कृत्य

आजच्या काळात आंतरधर्मीय लग्न हे सामान्य झाले आहे, पण असे असतानाही काही ठिकाणी आंतरधर्मीय लग्न केल्याने धक्कादायक घटना घडताना दिसून येतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

एका अल्पवयीन मुलीने एका हिंदू धर्माच्या अनाथ मुलासोबत लग्न केले आहे. या लग्नामुळे तिचे चुलते आणि नातेवाईक नाराज झाले असून त्यांनी तिला मारहाण केली आहे. तसेच तिचे मुंडण करुन तिला त्या परीसरात फिरवले आहे.

तरुणीसोबत नातेवाईकांनी केलेल्या या सर्व गोष्टीची माहिती मिळताच त्या गावातल्या लोकांनी या गोष्टीला विरोध केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपुर कोतवाली क्षेत्रातील एका गावात घडली आहे.

तसेच या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्या मुलीच्या नातेवाईकांवर कारवाई केली आहे. घटनेत सामील असलेल्या तरुणीच्या सख्ख्या भावाला चुलत चुलत्याला आणि चुलत भावाला अटक केली आहे. तसेच त्यांच्याशिवाय ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

फतेहपुर कोतवाली क्षेत्रातल्या या गावात एक मिथुन नावाचा एक युवक राहतो. त्याच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. तसेच त्या तरुणीच्याही आईवडिलांचे निधन झाले असून ती तरुणी आपल्या आजी-आजोबांकडे राहते. काही दिवसांपासून त्या तरुणीचे आणि त्या तरुणाचे प्रेमसंबंध होते.

रविवारी त्या दोघांनी एका धार्मिक स्थळी दोघांनी विवाह केला. यानंतर ती तरुणी आपल्या मर्जीने त्या तरुणाच्या घरीने राहायला गेली. या गोष्टीची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी मिथुनच्या घरी आले, तेव्हा मिथुन कामानिमित्त घराबाहेर गेला होता.

तेव्हा चुलत्याने आणि भावांनी मिळून तिला मारहाण केली, तसेच तिच्या डोक्यावरचे सर्व केस कापले. तसेच जीवमारण्याची धमकी पण दिली. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी ती तरुणी तिथून पळून पोलिस स्थानकात आली आणि नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी रिमा लागूने सोडली होती बॅंकेतील नोकरी
..म्हणून संजय दत्तवर भयंकर चिडले होते सुनील दत्त; घर सोडून जाण्याची दिली धमकी
बाप माणूस! रक्ताचे नाते नसतानाही स्वीकारले १५ अंध मुलांचे पितृत्व, वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.