‘पूजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयातच मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं’

मुंबई : सध्या राज्यात पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येवरुन चर्चा सुरु असून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. भाजपाकडून वनमंत्री संजय राठोड यांचं जाहीरपणे नाव घेतले जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.

तर आता दुसरीकडे पूचा चव्हाणच्या नातेवाईक शांताबाई राठोड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पूजानी आत्महत्या केली नाही. पूजाला ज्या यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरून फेकले असावे. असा संशय राठोड यांनी व्यक्त केला.

वडिलांनी प्रथमच केला खुलासा…
“पूजावर खूप ताण होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढलं होतं. पोल्ट्री फार्मसाठी तिने कर्ज घेतलं होतं, यामध्ये तिचं खूप मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये काही होणार नाही म्हणून आपण पुण्याला जाऊन दुसरं काही तरी करते असं ती म्हणाली होती,” अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.

याचबरोबर “आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती,” असेही त्यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
एक दिवस त्याला भेटण्याची संधी मिळो…! चिमुकल्याचा आवाज ऐकून शंकर महादेवनही भारावले
भाजपच्या फ्लॉप सभेचे छायाचित्र व्हायरल; फलकावर सात, स्टेजवर पाच नेते अन् समोर एकच कार्यकर्ता…
शालूचा अदांनी चाहते घायाळ; सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.