हुबेहूब रेखाची कॉपी आहे त्यांची बहीण राधा; पहा फोटो

बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखाला ओळखले जाते. फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये त्यांचे येते. बॉलीवूडमध्ये येणाऱ्या नवीन अभिनेत्री त्यांच्यासमोर फिक्या पडतात. सुंदरता आणि फिटनेसच्या बाबतीत रेखा सर्वांना मागे टाकतात.

खुप लहान वयातच रेखाने अभिनय क्षेत्रात डेब्यू केला होता. त्यामूळे त्यांना अभिनय क्षेत्रात खुप जास्त अनूभव आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्येच रेखाने चांगले यश मिळवले होते.

त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांची जोडी सर्वाधिक पसंत केली गेली ती म्हणजे अमिताभ बच्चनसोबत. या दोघांच्या अफेअरच्या देखील खुप जास्त चर्चा होत्या. अमिताभ आणि रेखाचे लग्न होऊ शकले नाही.

रेखा त्यांच्या अफेअरमूळे देखील नेहमीच चर्चेत असतात. पण त्यांच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल आणि कुटूंबाबद्दल खुप कमी लोकांना माहीती आहे. आज आम्ही तुम्हाला रेखाच्या छोट्या बहीणीबद्दल सांगणार आहोत.

रेखाला सहा बहीणी आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांची छोटी बहीण राधाबद्दल सांगणार आहोत. राधा हुबेहूब रेखाची कार्बन कॉपी आहेत. रेखा आज पण भलेही चित्रपटांपासून दुर असल्या. तरी अवॉर्ड फंक्शन आणि अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना पाहीले जाते.

रेखा कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेल्या तरी त्यांच्या सुंदरतेने चार चांद लावतात. असेच काही सौंदर्य त्यांची बहीण राधाचे देखील आहे. त्या दिसायला हुबेहूब रेखासारख्या दिसतात. दोघींना एकत्र पाहून ओळखणे कठिण होते.

फक्त सुंदरताच नाही तर राधा यांनी अभिनय क्षेत्रात देखील काम केले आहे. राधाने साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांचे करिअर जास्त काळ टिकू शकले नाही. त्यांना बहीण रेखासारखे यश मिळाले नाही.

म्हणून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राधाने त्यांचा लहानपणीचा मित्र आणि मॉडेल उस्मान जैनसोबत लग्न केले आहे. उस्मान लेखक आणि दिग्दर्शक एस.एम. आब्बासचा मुलगा आहे. लग्नानंतर राधा नवऱ्यासोबत बाहेर देशात स्थायित झाल्या.

लग्नामूळे त्यांनी फिल्मी करिअर सोडले. पण आज त्या अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतात. राधाला पेटींग्स खुप आवडतात. त्यामूळे त्या नेहमी पेटींग्स करत असतात. त्यांच्या पेटींग्स लोकांना खुप जास्त आवडतात.

रेखा साऊथ अभिनेत्री पुष्पवल्ली आणि साऊथ सुपरस्टार जेमिनी गणेशनच्या कन्या आहेत. दोघांचे लग्न झाले नव्हते. रेखाच्या जन्मानंतर त्यांच्या आई वडीलांनी लग्न केले होते. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. ज्यामूळे त्यांचे कुटूंब तुटले.

महत्वाच्या बातम्या –
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत आहे माधूरी दिक्षितचा ३६ चा आकडा; जाणून घ्या कोण कोण आहेत त्या अभिनेत्री
इम्रान हाश्मीसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर देखील अभिनेत्रीचे करिअर झाले फ्लॉप; पहा कोण आहे ती अभिनेत्री
विनायक माळीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागच खर कारण आलं समोर; जाणून घ्या पुर्ण माहिती..
प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरने गुपचूप केले लग्न? भांगात कुंकू भरलेले फोटो आले समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.